Murder mystery: पतीला मारण्याचा खतरनाक प्लॅन! आधी दारू पाजली, मग बिल्डींगवरून फेकलं, मेला नाही म्हणून मग...

त्यामुळे काहीच पळवाट राहीली नाही. संध्याने गुन्ह्याची कबुली दिली. सध्या संध्या आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राजा सुर्यवंशी, केतन अग्रवाल ही प्रकरणं ताजी आहेत. याची चर्चा संपूर्ण देशभर होत आहेत. असं असताना आणखी एक अशा पद्धतीचं पण त्या पेक्षा ही भयंकर प्रकरण समोर आलं आहे.  ही घटना  ​तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात घडली आहे. पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत क्रुर अशीच ही घटना म्हणावी लागेल. नर्स असलेल्या एका महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पतीची अतिशय निर्घृण हत्या केली. हत्या करताना तिने वापरलेली पद्धत पाहून पोलिस ही चक्रावले आहेत.  

पतीला मारण्यासाठी या नर्स महिलेने एक षडयंत्र रचलं होतं. त्यानुसार तीने पतीला पहिले दारू पाजली. मग त्याला गच्चीवरून खाली फेकून दिले. मात्र तरी ही तो मेला नाही. हे पाहाताच नर्सनं अतिशय क्रुर पाऊल उचलले. नवऱ्याला तिने चक्क  टॉयलेट क्लिनरचे इंजेक्शन देऊन यम सदनी धाडले. ​मृत पतीचे नाव  प्रशांत असं आहे. हा गेल्या दोन वर्षांपासून गल्फ देशात नोकरी करत होता. तो नुकताच सुट्टीसाठी घरी परतला होता. मात्र, प्रशांतच्या अनुपस्थितीत त्याची पत्नी संध्या हिचे शेजारी राहणाऱ्या अनिल नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. तिथेच या हत्येची कहाणी लिहीली गेली होती. 

Advertisement

नक्की वाचा - Neet Protest: पोलीस फरफटत होते, त्याच वेळी राहुल गांधीच्या कानात पोलीस काय म्हणाले? सर्वात मोठा गौप्यस्फोट

प्रशांत भारतात परतल्यामुळे आपल्या प्रेमसंबंधांचा पर्दाफाश होईल, अशी भीती त्याची पत्नी संध्याला वाटू लागली होती. यातूनच तिने प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. काही करून प्रशांतला संपवायचे असं संध्याने आणि तिच्या प्रियकराने ठरवलं. त्यातून संध्याने सुरुवातीला पतीला दारू पाजून गच्चीवरून खाली फेकून मारण्याचा कट आखला. त्यानुसार अनिल आणि प्रशांतने गच्चीवर दारू प्यायली. प्रशांतला जास्त दारू जाणीव पूर्वक पाजण्यात आली.  प्रशांत पूर्णपणे नशेत असताना त्याला खाली ढकलून देण्यात आले. पण सुदैवाने तो किरकोळ दुखापतींवर वाचला.

नक्की वाचा - Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 3 मागण्या! सरकारचं टेन्शन वाढलं, कोंडी फुटणार की प्रकरण चिघळणार?

प्रशांत वाचला हे दोघांसाठी ही धक्का होता. त्यामुळे संध्या नवऱ्याला रुग्णालयात दाखल केले. पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर संध्याने तिच्या वैद्यकीय ज्ञानाचा गैरवापर केला. तिने बाथरुम साफ करण्याचे 'टॉयलेट क्लिनर' सिरिंजमध्ये भरून प्रशांतच्या शरीरात टोचले. या विषारी द्रवामुळे प्रशांतची प्रकृती वेगाने बिघडली. ती इतकी बिघडली की त्याचा त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ​प्रशांतच्या अकस्मात मृत्यूबाबत नातेवाईकांना संशय आला. त्यांनी पोलिसांना ही शंका बोलून दाखवली. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला. सुरुवातीला संध्या पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देत होती. परंतु फॉरेन्सिक आणि वैद्यकीय अहवालात सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या. त्यामुळे काहीच पळवाट राहीली नाही. संध्याने  गुन्ह्याची कबुली दिली. सध्या संध्या आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.