जाहिरात

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 3 मागण्या! सरकारचं टेन्शन वाढलं, कोंडी फुटणार की प्रकरण चिघळणार?

दरम्यान राहुल गांधी यांना काल झालेल्या अटकेबाबत ही त्यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले मला काल मारहाण झाली ही मोठी गोष्ट नाही.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 3 मागण्या! सरकारचं टेन्शन वाढलं, कोंडी फुटणार की प्रकरण चिघळणार?
  • राहुल गांधी यांनी नीट परीक्षा पेपर लिक प्रकरणावर सरकारकडे तीन मागण्या केल्या आहेत
  • त्यांनी मागणी केली की शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याऱ्या विरोधात कारावाई व्हावी
  • राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे
नवी दिल्ली:

नीट परीक्षा पेपर लिक प्रकरणावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमीक घेतली आहे. त्यांनी आता सरकार समोर 3 मागण्या ठेवल्या आहेत. या तिन मागण्या मान्य केल्यानंतर संसदेतील कोंडी फुटेल असं ही त्यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी एक सादरीकरण केलं. त्यात त्यांनी सध्याच्या शिक्षण व्यवस्था कशी आहे. नीटचे पेपर लिक गेल्या 10 वर्षात किती वेळा फुटले. किती विद्यार्थ्यांचे नुकसान झाले यावर भाष्य केलं. शिवाय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. 

राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तीन प्रमुख मागण्या सरकार समोर ठेवल्या. त्यात पहिली मागणी ही शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होती. प्रधान हे शिक्षण मंत्री म्हणून फेल झाले आहेत. ते शिक्षण मंत्रालय चालण्यासाठी सक्षम नाहीत. त्यामुळ सरकारने त्यांचा राजीनामा तातडीने घ्यावा अशी पहिली मागणी करण्यात आली. त्यानंतर शांत पणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज करायला सांगितला. त्याला जबाबद असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी दुसरी मागणी त्यांनी केली आहे. तिसरी आणि शेवटची मागणी ही होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. या तीन मागण्या त्यांनी सरकार समोर ठेवल्या आहेत. या मागण्या आपल्या नाहीत तर विद्यार्थ्यांच्या आहेत. आपण विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत आहोत असं ही त्यांनी स्पष्ट केलं. 

नक्की वाचा - Delhi Protest:'आधी राजीनामा, नंतरच चर्चा', विरोधकांचा हंगामा, लोकसभेचे कामकाज सलग तिसऱ्या दिवशी ही ठप्प

त्या आधी राहुल गांधी यांनी एक सादरीकरण केलं. त्यात त्यांनी गेल्या 10 वर्षात  152 वेळा नीट पेपर लिक झाल्याचं सांगितलं.  त्याचा  7.5 कोटी विद्यार्थ्यांना फटका बसला. त्यावर सरकारने काही केलं नाही. एका ही व्यक्तीला जबाबदारी धरलं नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केली नाही. सगळी शिक्षण व्यवस्थाच नष्ट करण्यात आली असा आरोप राहुल यांनी या वेळी केला. नीट परीक्षेला बसलेल्या गरीब आणि मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना याचा फटका बसला. काही विद्यार्थी निराश झाले. त्यातून काहींनी आत्महत्या ही केल्या असं राहुल गांधी म्हणाले. ज्यांच्याकडे पैसे आहेत अशा श्रीमंतांनी लिक झालेले पेपर घेतले. त्यांना ते शक्य आहे. पण गरीब विद्यार्थ्यांचे काय. त्यांनी तयारी करून शेवटच्या क्षणी त्यांना पेपर लिक झाले आहेत असं सांगण्यात आलं. तो आघात मोठा आहे असं ही राहुल यावेळी म्हणाले. 

नक्की वाचा - CIDCO News: सिडकोचं स्वप्नातलं घर मिळणार! 8795 घरांची लॉटरी जाहीर, अन्य घरांच्या लॉटरीबाबत सस्पेन्स

या सगळ्या गोष्टींचा राग विद्यार्थ्यांच्या मनात होता. त्यामुळे ते रस्त्यावर उतरले. ते शांततेत आंदोलन करत होते. पण त्याच वेळी त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आलं. प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांवर लाठी का चालवली?  विद्यार्थी  शांत पणे आंदोलन करत होते. ते काही तरी विचारत होते. ते कोणता ही गुन्हा करत नव्हते. त्याचं म्हणणं ऐवढचं होतं की आम्ही विद्यार्थी आहोत आमचं ऐका. पण सरकारने त्यांचे ऐकले नाही. विद्यार्थी आंतकवादी नाहीत. ते आमचं भविष्य आहेत. ते दुष्मन नाहीत. ते आमचे लोक आहेत. त्यांच्यावर ज्यांनी लाठी चालवली त्यांच्यावर कारवाई झालीच पाहीजे असं ही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या या मागण्याकडे आता सरकार कशा पद्धतीने पाहते हे पाहावे लागेल. 

नक्की वाचा - दिल्लीच्या राजकारणात मोठी घडामोड! शरद पवार,सुप्रिया सुळे PM मोदींच्या भेटीला; भेटीचं कारण आलं समोर

दरम्यान राहुल गांधी यांना काल झालेल्या अटकेबाबत ही त्यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले मला काल मारहाण झाली ही मोठी गोष्ट नाही. अजून जरी त्यांनी मला मारलं तरी तो मार खाण्याची माजी तयारी आहे. विद्यार्थ्यांचा आवाज होणं हेच माझं काम होतं, ते केलं. माझ्यासाठी हा मोठा गौरव होता. त्यामुळे असे बुक्के मी अनेक वेळा खाण्यासाठी तयार आहे. पोलिस मला ओढत होते. पण ते कानात मला सांगत होते की या सरकारला तुम्ही हटवा. आम्ही फक्त वर्दीत आहोत. आम्ही वरून आलेल्या आदेशांचे पालन करत आहोत. असं ही राहुल यावेळी म्हणाले.  

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com