जाहिरात

Neet Protest: पोलीस फरफटत होते, त्याच वेळी राहुल गांधीच्या कानात पोलीस काय म्हणाले? सर्वात मोठा गौप्यस्फोट

आपल्याला विद्यार्थ्यांची काळजी आहे. माझ्यासोबत जे करायचं आहे ते करा. मी घाबरत नाही. पण विद्यार्थ्यांचा आवाज आपण उचलणार आहोत असं राहुल म्हणाले.

Neet Protest: पोलीस फरफटत होते, त्याच वेळी राहुल गांधीच्या कानात पोलीस काय म्हणाले? सर्वात मोठा गौप्यस्फोट
  • राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते
  • राहुल गांधी म्हणाले की पोलिसांनी त्यांना ओढले पण कानात त्यांनी सरकार हटवण्याचा संदेश दिला होता
  • पोलिसांमध्ये राजस्थान आणि हरियाणाचे कर्मचारी होते आणि त्यांनी आपल्याला सरकारविरोधी भावना व्यक्त केल्या
नवी दिल्ली:

राहुल गांधी यांना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानबाहेरून फरफटत पोलिसांनी नेलं. त्याची दृष्य संपूर्ण देशानी पाहिले. त्याचे व्हिडीओ आणि फोटो ही नंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यावेळी राहुल गांधी यांच्या नाकाला इजा झाल्याचे ही समोर आले. राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलं. नंतर रात्री उशिरा सोडण्यात आलं. मात्र  या सर्व राड्या वेळी नक्की काय झालं याचा किस्साच राहुल गांधी यांनी सांगितला आहे. त्यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.  

राहुल गांधी यांना पोलिसांनी काल ताब्यात घेतले. त्यावेळी नक्की काय झालं याबाबत राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की पोलिस मला ओढत होते. पण त्याच वेळी ते कानात मला सांगत होते, की या सरकारला तुम्ही हटवा. आम्ही फक्त वर्दीत आहोत. आम्ही वरून आलेल्या आदेशांचे पालन करत आहोत. असं राहुल यांनी सांगितलं.  त्यातील कुणी राजस्थानचं होतं. तर कुणी हरियाणाचे पोलिस होते. ते फक्त त्यांचे काम करत होते. पण त्यांना या सरकार बात काय वाटतं हे त्यांनी आपल्या कानात सांगितलं असं राहुल म्हणाले. 

नक्की वाचा - Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 3 मागण्या! सरकारचं टेन्शन वाढलं, कोंडी फुटणार की प्रकरण चिघळणार?

पुढे त्यांनी सांगितलं की मला काल मारहाण झाली ही मोठी गोष्ट नाही. अजून जरी त्यांनी मला मारलं तरी तो मार खाण्याची माझी तयारी आहे. विद्यार्थ्यांचा आवाज होणं हेच माझं काम होतं, ते मी केलं. माझ्यासाठी हा मोठा गौरव होता. त्यामुळे असे बुक्के मी अनेक वेळा खाण्यासाठी तयार आहे. या सरकारकडून मी हे अनेक वेळा सहन केलं आहे. पुढे ही सहन करेन त्याची मला सवय झाली आहे असं ही त्यांनी स्पष्ट केलं. माझ्या सोबत पोलीस  कसे वागले त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मी त्याची काळजी करत नाही. त्यांनी माझ्यासोबत किती ही वेळा ही असं वागावं माझी त्यांना सामोरे जाण्याची तयारी आहे असं ही त्यांनी सांगितलं. 

नक्की वाचा - Delhi Protest:'आधी राजीनामा, नंतरच चर्चा', विरोधकांचा हंगामा, लोकसभेचे कामकाज सलग तिसऱ्या दिवशी ही ठप्प

आपल्याला विद्यार्थ्यांची काळजी आहे. माझ्यासोबत जे करायचं आहे ते करा. मी घाबरत नाही. पण विद्यार्थ्यांचा आवाज आपण उचलणार आहोत. काही झालं तरी त्यांना न्याय मिळवून देण्याची आपली जबाबदारी आहे असं ही त्यांनी सांगितलं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणी नुसार शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पहिले राजीनामा दिला पाहीजे. शिवाय लाठीचार्जसाठी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागीतली पाहीजे असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com