![Thief Robs Liquor: दारु चोरण्यासाठी वाईनशॉपमध्ये घुसला, चोरी केली पण एका गोष्टीने घात केला Thief Robs Liquor: दारु चोरण्यासाठी वाईनशॉपमध्ये घुसला, चोरी केली पण एका गोष्टीने घात केला](https://c.ndtvimg.com/2024-12/72rp32l8_crime_625x300_31_December_24.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वच जण जय्यत तयारी करत आहे. त्यात तळीरामांचा खास प्लॅन असतो. सर्व तयारी आधीच केलेली असते. असा तळीराम दारु चोरी करण्याच्या उद्देशाने वाईनशॉपमध्ये घुसला होता. पण ज्या वेळी तो वाईनशॉपमध्ये घुसला त्यावेळी त्याच्या समोर मोठ्या प्रमाणात दारु होती. वेगवेगळ्या ब्रँडची दारू होती. अशा वेळी चोरी करु की दारु ढोसू असा प्रश्न त्याच्या समोर होता. अशा वेळी त्याने दारु पिण्याला प्रथम प्राधान्य दिलं. तो इतकी दारु प्यायला की आपण इथे चोरी करायला आलो आहोत हेच तो विसरुन गेला. त्यानंतर जे काही झालं त्यामुळे सर्वच जण हैराण झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना तेलंगाणा राज्यातील मेडक या जिल्ह्यात झाली. इथं कनकदुर्गा नावचं वाईन शॉप आहे. इथं चोरी करण्याचं एका चोराने ठरवलं. नियोजना नुसार दुकान बंद झाल्यानंतर चोर दुकानाचं छत फोडून आतामध्ये घुसला. आता त्याला सीसीटीव्ही कॅमेरा दिसला. त्याची त्याने तोडफोड केली. त्याच वेळी त्याने काही पैसे आणि दारुच्या बाटल्या चोरल्या. त्याच वेळी त्याचे लक्ष दारुच्या दुकानातील ब्रँडेड दारुच्या बाटल्यांकडे गेलं. त्या बाटल्या त्याला खुणावत होत्या.
अशा स्थितीत त्याने दारु पिण्याचा निर्णय घेतला. चोरी केलेलं सामान त्याने बाजूला ठेवलं. त्यानंतर दारु आणि बिअरच्या बाटल्या तो पाण्या सारखा प्यायला. तो इतका दारु प्यायला की तो आपली शुद्धच हरपून बसला. शेवटी तो दारु पिऊन बेशुद्ध पडला आणि दारुच्याच दुकानात गाड झोपी गेला. सकाळी दुकानातले कर्मचारी आणि मालक आले. त्यांनी तिथे त्याला झोपलेले पाहीले. हा चोर आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसही त्या दुकानात दाखल झाले. पण ते काही करू शकत नव्हते. तो तळीराम गाड झोपेत होता. त्याला कसलीही शुद्ध नव्हती. त्यामुळे तो शुद्धीवर येण्याची पोलिसांनाच वाट पहावी लागली. पोलिसांना नाईलाजाने त्याला एका दवाखान्यात दाखल करालं लागलं. तो जोपर्यंत शुद्धत येत नाही तोपर्यंत पोलिसांनाही कोणती कारवाई करता आली नाही. मात्र हा चोरीच्या उद्देशाने दुकानात घुसला होता. एका पिशवीत त्याने पैसे आणि काही दारुच्या बाटल्या टाकल्या होत्या. तो बाहेर पळून जाणार होता. पण त्याच वेळी त्याने तिथेच दारु पिण्याचा निर्णय घेतला. तो प्रमाणा पेक्षा जास्त दारु प्यायल्यामुळे तिथून पळून जावू शकला नाही असं पोलिसांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world