जाहिरात

Walmik karad: वाल्मिक कराड अडकणार की सुटणार? शरण आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा काय?

राजकीय वर्तुळात या शरणागतीबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Walmik karad: वाल्मिक कराड अडकणार की सुटणार? शरण आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा काय?
पुणे:

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक व्हावी यासाठी दबाव वाढत होता. राजकीय वातावरणही तापले होते. 20 दिवसानंतरही आधी पोलिस नंतर सीआयडीला त्याचा पत्ता लागत नव्हता. अशा वेळी अचानक वाल्मिक कराड यांने पुण्यात सीआयडी समोर शरणागती पत्करली. त्यानंतर राजकीय वर्तुळात या शरणागतीबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तर सत्ताधाऱ्यांनी वेट अँण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुरेश धस यांची मोठी मागणी 

या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. विधानसभे पासून अगदी रस्त्यावरही धस यांनी हा मुद्दा लावून धरला होता. वाल्मिक कराड शरण आल्यानंतर धस यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. वाल्मिक कराड शरण आला असेल तर चांगली बाब आहे. शेवटी पळूनपळून ते कुठं पर्यंत पळणार होते. कुठे ही गेले असते तरी पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचलेच असते. मात्र यानंतर धस यांनी मोठी मागणी केली आहे. जर ते शरण आले असले तरी त्यांची संपत्ती जप्त करण्याची जी प्रक्रीया सुरू आहे ती सुरूच राहीली पाहीजे अशी मागणी त्यांनी या निमित्ताने केली आहे. मारेकऱ्यांना आदेश देणारा आका हाच होता असं धस या वेळी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी -  Walmik Karad Surrender :वाल्मिक कराडचा नवा Video, पुणे CIDला शरण जाण्यापूर्वी काय म्हणाला?

संतोष देशमुखांची लेक काय म्हणाली? 

माझ्या वडीलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना एवढा वेळ का लागला. पोलिस यंत्रणा इतके दिवस काय करत होती? असे प्रश्न संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हीनं उपस्थित केले आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय कधी मिळणार असंही ती म्हणाली. सर्वांचे मोबाईल रेकॉर्ड तपासले जावेत. त्यात जे जे सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे असंही ती म्हणाली. एकानं आता सरेंडर केले आहे. पण ज्यांनी हत्या केली त्यातले तीन प्रमुख आरोपी अजूनही मोकाट आहेत. त्यांना कधीपर्यंत अटक होणार असा प्रश्न तिने उपस्थित केला. शिवाय आपल्या वडीलांचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये असंही ती म्हणाली.

ट्रेंडिंग बातमी - Beed Crime : संताच्या भूमीत दहशतीचे वातावरण ! बीड की बिहार ?

'हा तर पोलिसांचा नाकर्तेपण'

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी सरकार आणि पोलिसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या अर्थी वाल्मिक कराड याने आत्मसमर्पण केलं. हा तर पोलिसांचा नाकर्तेपणा आहे. त्याला पोलिसांना अटक करता आले नाही. तो स्वत: पोलिसां समोर हजर झाला. त्यामुळे मी कधी ही येणार, कधी ही बाहेर पडणार, मला वाटेल तेच करणार हेच कराडने यातून दाखवून दिले आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या. जरी तो सरेंडर झाला असेल तरी चौकशी किती प्रामाणिकपणे होते यावर सर्व अवलंबून आहे. पुराव्यां बरोबर छेडछाड होण्याची भितीही त्यांनी या निमित्ताने व्यक्त केली. 

ट्रेंडिंग बातमी - Who is Walmik Karad : कोण आहे वाल्मिक कराड? शरण आल्यानंतर राजकीय भूकंप, 10 मुद्द्यांमध्ये समजून घेऊया

'जामीन मिळणं कठीण' 

वाल्मिक कराडने आपल्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. शिवाय आपण अटकपूर्व जामीनासाठी पात्र आहोत, असं म्हटलं आहे. यावर वकील असीम सरोदे यांनी तांत्रिक बाब समोर आणली आहे. ज्या अर्थी कराड हा सरेंडर झाला आहे त्यानुसार त्याला आता अटकपूर्व जामीन करता येणार नाही. शिवाय अशा गंभीर प्रकरणात त्याला जामीन मिळणेही अवघड असल्याचं असिम सरोदे यांनी स्पष्ट केलं आहे. हे लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. या सर्वा मागे मोठं अर्थकारण आहे. असं सरोदे म्हणाले. त्यामुळे या सर्व गोष्टी पाहात त्याला जामीन मिळणे अवघड असल्याचे सरोदे म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad Update : आताची मोठी बातमी, वाल्मिक कराड पोलिसांना शरण

सोळंके, आव्हाड, दमानियांचा हल्लाबोल 

या प्रकरणी पहिल्यापासून आमदार प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया ह्या आक्रमक होत्या. हे आत्मसमर्पण म्हणजे तपास यंत्रणांचे अपयश आहे अशी प्रतिक्रीया सोळंके यांनी दिली आहेत. तर हे आत्मसमर्पण कसलं, या वाल्किक कराडला रस्त्यावरून फरफटत आणलं पाहीजे होतं. या चौकशीला काही अर्थ नाही. तो कोणत्या गुन्ह्यात सरेंडर झाला आहे असा प्रश्नही या निमित्ताने आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. तर कराडला सरकारकडूनच संरक्षण दिले जात होते असा आरोप दमानिया यांनी केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Live Update : वाल्मिक कराड शरण : ED चे अधिकारीदेखील चौकशीसाठी पुण्यातील CID कार्यालयात दाखल

'निर्दोष आहात तर  हे आधी का सुचलं नाही' 

सरेंडर झालात हे चांगले केलं. पण जे आधीच का केलं नाही असा प्रश्न खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. शिवाय ते कोणत्या गुन्ह्यात सरेंडर झाले आहेत. त्यांचा या मर्डर बरोबर संबध आहे का? याचा उलगडा आता पोलिसांनी करावा. ते आपण निर्दोष असल्याचं सांगत आहेत. हा त्यांचा अधिकार आहे. मग असं होतं तर ऐवढे दिवस लपून का होता असा प्रश्नही त्यांनी केला. ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी समोर का आला नाही. बाहेर पळून का गेला असा प्रश्न सोनवणे यांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी : 2 पोलीस बॉडीगार्ड, 15 गंभीर स्वरुपाचे गुन्हे तरीही शस्त्र परवाना कसा? बीड स्थानिक प्रशासनावर अनेक सवाल 

'फडणवीसांनी फास आवळले'

देवेंद्र फडणवीसांनी कडक पावलं उचलली. त्यामुळेच कराडला शरण येण्या शिवाय पर्याय राहीला नाही. आधी संपत्ती जप्त केली. त्यानंतर पत्नीला चौकशीला बोलावलं. पोलिसही त्याच्या जवळ पोहोचले होते. त्यामुळे त्याच्या पुढे कोणताही पर्याय राहीला नाही. आता पोलिस चौकशी करतील. विरोधकांनी पोलिस आणि राज्याला बदनाम करू नये असं भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी सांगितलं आहे. गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com