संजय तिवारी, नागपूर
नागपूरमधील डिगडोह गावातील नागरिक सध्या दहशतीखाली आहेत. कारण एक व्यक्ती रात्रीच्या अंधारात घरात घुसून महिलांचा कपडे फाडायचा आणि पळून जायचा. नागरिकांनी या विक्षिप्त इसमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. मात्र त्याची पुन्हा सुटका झाल्याने परिसरातील महिलांमध्ये भीती मात्र कायम आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष कुमार दास असं या आरोपीचं नाव असून तो मूळ बिहारचा आहे. रात्रीच्या वेळी उशीरा घरात शिरून आरोपी महिलांच्या अंगावरचे कपडे ब्लेडने फाडायचा. मात्र याबाबत सांगण्यासही लाज वाटत असल्याने महिला देखील मौन पाळून होत्या.
(नक्की वाचा - रिक्षा पार्किंगवरून निर्घृण हत्या, 5 वर्षांनंतर कुटुंबीयांना मिळाला न्याय! आरोपींना जन्मठेप)
डिगडोह गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात मागील 20-25 दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. एक माणूस रात्री 1 वाजेच्या नंतर दरवाजावर टॉर्च मारून तो पाहायचा. समजा दार उघडले तर तो आत शिरायचा आणि महिलांचे कपडे फाडायचा. मागील काही दिवसात अशा काही घटना समोर आल्या होत्या. अशाच एका घटनेदरम्यान लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतरही तो विक्षिप्तसारखा वागत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22-23 एप्रिलला काही महिला आणि पुरुषांनी तक्रार दिली होती. एक इसम रात्री घरात शिरतो आणि महिलांचे कपडे फाडतो. पण तो इसम सापडत नव्हता. 26-27 एप्रिलच्या रात्री नागरिकांनी या आरोपीचा पाठलाग करुन पकडलं. आरोपीची चौकशी केली असता तो मूळ बिहारचा असून इथे एका कंपनीत कामाला आला होता.
(नक्की वाचा: लंडन हादरलं! अज्ञाताकडून लोकांवर तलवारीने सपासप वार; लहानग्याचा मृत्यू-अनेकजण जखमी)
आरोपी अटकेनंतर एक-दोन दिवसातच तुरूंगातून बाहेर आला असून बिहारला गेल्याची माहिती आहे. मात्र अजूनही रात्री दारावर थाप पडल्याचे, छतावर चालल्याचे आवाज ऐकू येत असल्याचं गावकरी सांगतात. आरोपी बिहारला गेला यावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न नागरिकांचा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत कायम आहे.