आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लोनचे पैसे फेडले नाही म्हणून लोन वसूली एजंट यांनी जे कृत्य केलं त्यामुळे संपुर्ण कुटुंबच उद्धवस्त झाले आहे. ही घटना आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम इथे घडली. संबधीत व्यक्तीने एका खाजगी लोन ऐपकडून 2000 रूपयांचे कर्ज घेतले होते. ते त्याला वेळत फेडता आले नाही. त्यानंतर या ऐजंट लोकांनी जे काही केलं त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत. त्यानंतर अशा सहज कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यां विरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नरेंद्र नावाच एक तरूण विशाखापट्टणम इथे राहात होता. 25 वर्षीय या तरूणाने 28 ऑक्टोबरला अंतरजातीय प्रेमविवाह केला होता. तो मासेमारीचे काम करायचा. पण सध्या मासेमारी बंद असल्याने त्याला आर्थिक चणचण भासत होती. घर ही चालवायचे होते. त्यामुळे पैसे गरजेचे होते. त्यामुळे त्याने एका खासजी लोन अॅपकडून 2000 रूपयांचे कर्ज घेतले होते. लोन घेतल्यानंतर काही आठवड्यात ते भरण्यासाठी एजंट लोकांनी तगादा लावला होता.
ट्रेंडिंग बातमी - 40 पानांची चिठ्ठी, तासाभराचा VIDEO; पत्नीच्या छळामुळे इंजिनिअरने संपवले जीवन
त्यासाठी नरेंद्रला त्रास देण्यास सुरूवात केली होती. त्याला वाईट वाईट मेसेज पाठवले जावू लागले. ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी नरेंद्रच्या पत्नीचे मॉर्फ्ड केलेले फोटो व्हायरल केले. ते फोटो त्यांनी नरेंद्रच्या मित्रां बरोबरच नातेवाईकांनाही पाठवले. त्या फोटोवर किंमतीचा टॅगही लावण्यात आला. तो फोटो नरेंद्रच्या पत्नीकडे आला. त्यानंतर आपल्या पतीला तिने ते दाखवले. हे पाहून नरेंद्र पुर्ण पणे हादरून गेला.
ट्रेंडिंग बातमी - इंजिनिअर अतुल सुभाषचं टोकाचं पाऊल, दोष कुणाचा? कंगना रनौतचा तर्क काय?
या पती पत्नीने हे दोन हजाराचे कर्ज एका हफ्त्यात फेडण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी एजंट यांनी कोणतीही मदत केली नाही. उलट त्या पती पत्नीला त्रास देण्याचे सुरूच ठेवले. त्याच नरेंद्रचे मित्र आणि कुटुंबीय त्याला या फोटो बाबत फोन करून विचारत होते. त्यामुळे नरेंद्र प्रचंड अपमानीत झाला. तो पूर्णपणे खचून गेला. लग्नाला केवळ सहा महिने झाले होत. अशात हा प्रकार झाल्याने खचलेल्या नरेंद्रने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
ट्रेंडिंग बातमी - महत्वाची खाती भाजपकडेच राहाणार? मित्रपक्षाकडील खाती ही खेचून घेण्याची तयारी?
लोन अॅपच्या एजंटकडून आंध्रप्रेदशात सध्या धुमाकूळ सुरू आहे. एका आठवड्यातलीही तिसरी घटना आता समोर आली आहे. या आधी नंदयाल जिल्ह्यातील एका तरूणीलाही अशाच पद्धतीने त्रास दिला होता. तीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी पोलिसांनी तिला वाचवलं. सहज लोन मिळत असल्याने अनेक जण या लोन अॅपला फसतात आणि बळी पडतात. या विरोधात आता कडक कारवाी केली पाहीजे अशी मागणी जोर धरत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world