छत्रपती संभाजीनगर: चोरी करण्यासाठी चोरटे कधी कोणती शक्कल लढवतील याचा काही नेम नाही. सोशल मीडियावरही चोरट्यांनी चोरीसाठी केलेल्या अनोख्या प्रतापांचे व्हिडिओ समोर येत असतात. अशीच धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी चक्क थार गाडीने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहानूरवाडी दर्गा परिसरातील एसबीआय बँकेच्या शाखेतील एटीएम मशीन चोरट्यांनी थार गाडीच्या मदतीने ओढून फोडण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (4 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेत एटीएम मशीन व केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान करण्यात आले. या प्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
Crime Story: चोरांनी महिला खासदाराच्या गळ्यातील चेन हिसकावली, दिल्लीत महिला खासदारही असुरक्षित?
विशाल हरिदास इंदूरकर (वय 48, रा. मिलेनिअम पार्क, चिकलठाणा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. ते एसबीआयच्या शहानूरवाडी शाखेत मॅनेजर आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, 4 ऑगस्टच्या पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान चार अज्ञात इसमांनी बँकेच्या एटीएम मशीनला महिंद्रा थार गाडीला बांधून ओढण्याचा प्रयत्न केला. तसेच स्क्रू ड्रायव्हरने एटीएमचे कव्हर उचकटण्याचा प्रयत्न करत केबिनमधील कॅमेरेही फोडण्यात आले. परंतु चोरट्यांना हे शक्य न झाल्यामुळे त्यांनी ताबडतोब पळ काढला. याप्रकार बॅकेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
Pune News: नवऱ्याला बेदम मारहाण, बायकोचं अपहरण; खेडमध्ये भरदिवसा सिनेस्टाईल थरार