बाप लेकीच्या नात्याला डाग, तेरा वर्षीय लेकीवर बापानेच टाकला हात

अमरावतीच्या मोर्शीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एक जन्मदात्या बापानेच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
अमरावती:

शुभम बायस्कार

अमरावतीच्या मोर्शीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एक जन्मदात्या बापानेच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बाप लेकीच्या नात्यालाच डाग लागला आहे. हिंम्मत करत पिडीत मुलीनं बापा विरोधात तक्रार दिली आहे. त्यांने या आधीही मुलीचे लैंगिक शोषण केले होते. नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
  
जन्मदात्या बापानेच आपल्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात उघड झाली आहे. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी 14 मे रोजी सायंकाळी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तक्रारीनुसार 29 एप्रिल रोजी सायंकाळी पीडित 13 वर्षीय मुलीची आई स्वयंपाक करण्यासाठी बाहेर गेली होती. त्यामुळे पीडित मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधत तिचा बाप घरात घुसला. त्याने मुलीकडे शारीरीक सुखाची मागणी केली. मात्र मुलीने त्यासाठी नकार दिला. मी तुमची मुलगी आहे. तुम्ही असं काही करू नका अशी विनवणी तिने केली.  मात्र त्यानराधमाने तिचे काही एक ऐकले नाही. 

Advertisement

हेही वाचा - कारमध्ये पेट्रोल भरत असतानाच कोसळले होर्डिंग, 55 तासानंतर मिळाला जोडप्याचा मृतदेह

उलट तुला चाकूने भोकसून मारेन अशी धमकी त्याने तिली दिली. धमकी मुळे मुलगी पार हादरून गेली होती. ती घाबरली होती. त्याचाच फायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार केले. मुलगी रडत होती. त्यावेळी तिला जिवे मारून टाकेन अशी धमकीही त्याने दिली. त्यामुळे काय करावे हे तिला समजत नव्हते. शेवटी धाडस करून तिने आपबीती आपल्या नातेवाईकांना सांगितली. हे ऐकून नातेवाईकांच्या पाया खालून वाळू सरकली. त्यांनी मुलीला घेऊन तातडीने मोर्शी पोलिस स्टेशन गाठलं. पोलिसांनीही तातडीने कारवाई करत त्या नराधम बापा विरोधात बलात्कार धमकी आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. शिवाय  त्याला अटक केली आहे.

Advertisement

Advertisement