भर रस्त्यात विवाहितेला नग्न करण्याचा प्रयत्न, पतीला बेदम मारहाण! टिटवाळा पोलिसांचा सल्ला ऐकून येईल संताप

Kalyan Crime News :  कल्याणजवळच्या टिटवाळ्यात एक अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

Kalyan Crime News :  कल्याणजवळच्या टिटवाळ्यात एक अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. टिटवाळ्यात  जुन्या वादातून एका विवाहितेची छेड काढत तिला नग्न करण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकराला विरोध करणाऱ्या विवाहित महिलेचा पती आणि त्याच्या कुटुंबीयांना देखील मारहाण झाली. या सर्व प्रकारातील आणि एक संतापजनक बाब म्हणजे टिटवाळा पोलिसांनी पीडित पतीला तू जास्त बोलू नकोस, घरी जा असा सल्ला दिला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

टिटवाळ्यातील बल्याणी परिसरात हा प्रकार घडला. या परिसरात राहणारे सोहम (बदललेले नाव) रविवारी संध्याकाळी त्यांच्या आईकडे रात्रीच्या जेवणासाठी गेले होते. सोहम यांचं . सोहम यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले आहे. दोघे पती पत्नी घरी परतत होते. या दरम्यान काही लोक त्यांच्या समोर आले. या लोकांसोबत सोहमचा एक जुना वाद हाेता. सोहमला बघून त्याची आधी खिल्ली उडविली. 

हा प्रकार इतक्यावरच थांबला नाही. यामधील एकानं सोहमच्या पत्नीचा हात पकडला आणि तुझी बायको आमच्याकडे पाठव अशी मागणी केली. आई वडिलांना बोलावून घेतले. त्याठिकाणी 20 ते 25 जणांच्या टोळक्याने सोहमच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. या संपूर्ण मारहाणी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

( नक्की वाचा : Kalyan : तरुणीचे फोटो काढताना सापडला विकृत! मोबाईल जप्त करताच सर्वच हादरले! कल्याणमधील धक्कादायक प्रकार )

टिटवाळा पोलिसांचा अजब सल्ला

या प्रकरणातील धक्कादायक म्हणजे टिटवाळा पोलिसांनी सोहमच्या  पत्नीचे काही एक न ऐकता सोहमवर दबाव टाकत तू काही जास्त बोलू नको, घऱी जा असा अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माझी पत्नी आणि माझ्यासोबत भयंकर प्रकार घडला आहे. या प्रकारची घटना कुणाबरोबरही घडू नये. आम्ही सध्या दहशतीमध्ये आहोत. आम्हाला न्याय हवा आहे, अशी मागणी सोहमनं केली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article