
अमजद खान, प्रतिनिधी
8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या महिला दिनी देखील जगभर वेगवेगळे कार्यक्रम पार पडले. नारी शक्तीच्या कार्याचा गौरव, त्यांच्याबद्दल कृतज्ञता या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आली. त्याचवेळी पुण्यापाठोपाठ कल्याणमध्ये देखील एक धक्कादायक घटना उघड झाली आहे.
पुण्यात गौरव अहुजा या मद्यधुंद तरुणाने भररस्त्यात अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकामध्ये मद्यधुंद तरुणाने गाडीतून उतरून महिलांसमोर अश्लील चाळे केले. सकाळच्या सुमारास शास्त्री चौकात निळ्या रंगाच्या बीएमडब्लू गाडीतून उतरुन या तरुणाने भररस्त्यात लघुशंका केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा प्रकार ताजा असतानाच कल्याणमध्येही एक संतापजनक प्रकार घडला आहे. रस्त्यावर ये जा करणाऱ्या महिला आणि मुलींचे फोटो काढणाऱ्या तरुणाला चोप देत नागरीकांनी खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रुपेश कोयते असे या तरुणाचे नाव आहे. रुपेशच्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणात महिला मुलींचे फोटो आढळून आल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलिसांनी सुरु केला आहे.
कल्याण पश्चीमेतील बारावे परिसरात एका तरुणाने रस्ताने जात असलेल्या एका तरुणीचा फोटो काढला. फोटा काढल्यानंतर तरुणीने या तरुणाला फोटो का काढला? असा जाब विचारला. हा सर्व प्रकार पाहून परिसरातील नागरिक तिथं जमा झाले. त्यांनी रुपेशला हटकले. त्यावेळी रुपेशनं त्यांना उलटसुलट उत्तरं दिली. हे पाहून काही नागरीकांनी त्याला चोप दिला. त्याचा मोबाईल नागरिकांनी तपासला त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमधील 'या' सोसायटीच्या प्रत्येक घरातील व्यक्ती आजारी! पालिका कधी लक्ष देणार? )
त्याच्या मोबाईलमध्ये महिला आणि मुलींसह वयोवृद्ध महिलांचेही फोटो त्या मोबाईलमध्ये होते. रुपेश कोयते या नावाच्या तरुणाला नागरीकांनी पकडून खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिस स्टेशनमध्ये बारावे परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात जमले होते. त्याला आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्याला शिक्षा देऊ, अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकारामुळे कल्याणच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world