जाहिरात

Torres Company : टोरेस प्रकरणात भारतीयांचे 200 कोटी परदेशात पाठवले? 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी

टोरेस गैरव्यवहार प्रकरणात 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.

Torres Company : टोरेस प्रकरणात भारतीयांचे 200 कोटी परदेशात पाठवले? 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी

गुंतवणूकदारांना मोठं आमिष दाखवत गुंतवणूक करा आणि व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा असे आवाहन करणाऱ्या टोरेस लिमिटेड (Torres company india) कंपनीत गुंतवणूक केलेल्या अनेकांचं भविष्य अंधारात सापडलं आहे. दरम्यान या प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. टोरेस गैरव्यवहार प्रकरणात 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

टोरेस गैरव्यवहार प्रकरणात (Torres Jewellery Scam) आर्थिक गुन्हे शाखेने 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. त्यात आठ युक्रेनचे व एक तुर्कस्थानच्या नागरिकाचा समावेश आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपीने 200 कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी (torres company owner) पसार झालेला तौसिफ रियाज उर्फ जॉन कार्टर याचा अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. 

Bangladesh Illegal migration : बांगलादेशींनी राज्यभर हात-पाय पसरले, कोकणातून धक्कादायक प्रकार उघड

नक्की वाचा - Bangladesh Illegal migration : बांगलादेशींनी राज्यभर हात-पाय पसरले, कोकणातून धक्कादायक प्रकार उघड

या प्रकरणाचा गुंता सोडविण्यासाठी तौफिक सापडणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत असून तो कुठे दिल्यास संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे. एखाद्या गुन्ह्याच्या तपासात महत्त्वाच्या व्यक्तीबद्दलची माहिती, तिची ओळख पटवणे आणि ती कुठे आहे, हे शोधण्यासाठी नोटीस काढली जाते. इंटरपोलने अशी नोटीस काढल्यानंतर सगळ्या देशांच्या पोलीस आणि तपास यंत्रणांना त्याबद्दलची माहिती दिली जाते.  त्यामुळे या यंत्रणा एखाद्या व्यक्तीला शोधून काढण्यासाठी किंवा तिच्या हालचालींबद्दलची माहिती मिळवून देण्यासाठी मदत करतात. त्यासाठी इंटरपोलच्या मदतीने ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात येते. त्यापूर्वी याप्रकरणात आरोपीविरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com