जाहिरात

Trending News: पोलीसाच्या घरी चोर! साहेब झोपले होते, चोर आले अन् त्यांनी जे काही केले त्याची सगळीकडेच चर्चा

स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा पंचनामा करण्यात आला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

Trending News: पोलीसाच्या घरी चोर! साहेब झोपले होते, चोर आले अन् त्यांनी जे काही केले त्याची सगळीकडेच चर्चा
AI Image
  • मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात हरिजन ठाण्याचे प्रभारी ब्रजमोहन रावत यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केली
  • चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अँगल लाकडाने बदलून आपली ओळख लपवली आणि खोलीतून चोरी केली
  • चोरी करताना पोलीस अधिकारी आणि त्यांचे कुटुंब गाढ झोपेत असल्याने चोरट्यांना कोणताही त्रास झाला नाही
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

चोरट्यांनी थेट कायद्याच्या रक्षकालाच आव्हान दिलं आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एका पोलीस निरीक्षकाच्या घरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टीआय ब्रजमोहन रावत आपल्या कुटुंबासह शेजारच्या खोलीत झोपलेले असताना, चोरट्यांनी त्यांच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. 'सैंया भए कोतवाल तो डर काहे का' ही म्हण मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात चोरट्यांनी खरी करून दाखवली आहे. चोरट्यांनी पोलीस निरीक्षकाच्या (TI) घरात शिरून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली. धक्कादायक बाब म्हणजे, चोरी होत असताना पोलीस अधिकारी आणि त्यांचे कुटुंब गाढ झोपेत होते.

अशोकनगर जिल्ह्यातील हरिजन ठाण्याचे प्रभारी ब्रजमोहन रावत यांचे घर शिवपुरीतील सिंहनिवास गावात आहे. 24 एप्रिलच्या रात्री चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला. चोरट्यांनी अत्यंत शिताफीने घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अँगल लाकडाच्या साहाय्याने बदलला. जेणेकरून त्यांची ओळख पटणार नाही. त्यानंतर खोलीची खिडकी तोडून  चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात सर्वत्र शांतता होती. त्यामुळे चोरट्यांना मोकळे रान मिळाले. तोपर्यंत त्यांना हे घर पोलीसाचे आहे याची कल्पना नव्हती. 

नक्की वाचा - Shocking news: आरोग्य व्यवस्थेची लक्तरे! रुग्णवाहिकेअभावी प्रसूतीनंतर मातेचे हाल, भर उन्हात बाळासह...

चोरट्यांनी आधी रेकी केली. त्यानंतर त्यांनी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील 4 तोळे सोने, चांदीचे दागिने आणि 50,000 रुपयांची रोकड लंपास केली. सर्व ऐवज घेवून हे चोरटे तिथून पळून गेले. तो पर्यंत घरात असलेल्या पोलीस साहेबांना याची कल्पनाच नव्हती. ते आणि त्यांचे कुटुंब गाढ झोपेत होते. तोपर्यंत घरातील सर्व काही साफ झालं होतं. सकाळी झोपेतून उठल्यानंतर रावत कुटुंबाला हा प्रकार समजला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस आता आपल्याच विभागातील अधिकाऱ्याच्या घरी चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

नक्की वाचा - MNS Rada: मनसेकडून संजय निरूपम यांचा करेक्ट कार्यक्रम! परप्रांतीय रिक्षावाल्यांची बाजू घेणं पडलं महागात

ब्रजमोहन रावत यांनी सुरक्षेसाठी घरात सीसीटीव्ही लावले होते, पण चोरटे त्यांच्यापेक्षाही हुशार निघाले. त्यांनी चोरी करण्यापूर्वी कॅमेऱ्याची दिशाच बदलून टाकली. यानंतर चोरट्यांनी कपाटातील 4 तोळे सोने आणि चांदीवर डल्ला मारला. सकाळी जेव्हा टीआय रावत यांना चोरी झाल्याचं समजलं, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने स्थानिक कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. मात्र, पोलीस अधिकाऱ्याच्याच घरात चोरी झाल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com