बीडमध्ये लाचखोरीच्या घटना वाढल्या, लाचलुचपत विभाग अलर्टवर, एकाच दिवसात दोन कारवाया!

बीड जिल्ह्यात लाच घेण्याचे प्रकार वाढत असताना सुरू असलेल्याला कारवायांमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
बीड:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात एसीबीच्या कारवायाचा सुरू असून आधी मंडळ अधिकाऱ्यावर मुरूम उत्खनन प्रकरणी कारवाई केली होती. ही घटना ताजी असतानाच पुढील चोवीस तासातच परळी येथील सेवा सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणाचे शुल्क कमी करण्यासाठी लाच घेणाऱ्या दोघांवर लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात अटक केली आहे. दरम्यान जिल्ह्यात लाच घेण्याचे प्रकार वाढत असताना सुरू असलेल्याला कारवायांमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

बीड जिल्हा पुन्हा एकदा लाचलुचपत विभागाच्या रडारवर आलेला दिसून येत आहे. सेवा सहकारी संस्था वानटाकळीचे सचिव बाबासाहेब धोंडीराम शिगे राहणार परळी वैजनाथ व सेवा सहकारी संस्था सारडगावचे सचिव अंकुश पवार राहणार तालखेड तालुका माजलगाव या दोघांनी वानटाकळी सेवा सहकारी संस्थेच्या सन 2008 ते सन 2021 या वर्षाचे लेखा परीक्षण करून अहवाल सादर करण्यासाठी लागणारे शुल्क कमी करण्यासाठी 1 लाख 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. 
     
याबाबत केलेल्या तक्रारीवरून धाराशिव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावत 1 लाख 25 हजार रुपयाची लाच स्वीकारताना बाबासाहेब शिगे, अंकुश पवार या दोघांनाही लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई धाराशिव लाचलुचपत कार्यालयाचे पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, पर्यवेक्षण अधिकारी सिद्धराम मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार आशिष पाटील, सिद्धेश्वर तावस्कर, सचिन शेवाळे, दत्तात्रेय करडे यांनी केली.

Advertisement

नक्की वाचा - विद्यार्थिनीला व्हिडीओ कॉल केला आणि... पालकांनी शिक्षकाला शोधून धु..धु..धुतले

क लाखाची लाच घेताना बीडमध्ये मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळयात..
काही दिवसांखाली मुरुमाचे अवैध उत्खनन प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मंडळ अधिकाऱ्याने याच प्रकरणात झालेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडअंती दीड लाख रुपये द्यायचे ठरल्यानंतर यातले 1 लाख रुपये स्विकारताना बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडळ अधिकाऱ्यास बीड एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

सचिन भागवत सानप (वय- 39) असं लाचखोर मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे.अवैध मुरुम उत्खनन प्रकरणातील तक्रारदाराच्या नातेवाईक आणि इतर काही जणांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मंडळ अधिकारी सानप याने याच गुन्ह्याच्या संदर्भात बीड तरफ खोड सज्जा अंतर्गत मोची पिंपळगाव येथील गट क्रमांक 49 मधील मुरुम उत्खनन जागेचा पंचनामा केला होता.

Advertisement

या पंचनाम्यात 1000 ब्रास ऐवजी 500 ब्रास उत्खनन दाखवून तक्रारदार यांना लाभ मिळवून देण्यासाठी सानपने पंचासमक्ष दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शेवटी यात दीड लाख रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले.या प्रकरणात बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक युनूस शेख,सुरेश सांगळे,श्रीराम गिराम,भरत गारदे,अमोल खरसाडे, हनुमान गोरे, संतोष राठोड,अविनाश गवळी,सुदर्शन निकाळजे,अंबादास पुरी,गणेश मेहेत्रे यांनी केली.