Shocking news: प्रेयसीचा साखरपुडा, प्रियकराची शेवटची इच्छा, हॉटेलमध्ये भेटले, रात्रभर राहीले, सकाळी मात्र...

तरुणी उदयपूरमधील ऋषभदेव येथील रहिवासी होती. ती विजय भोईसोबत हॉटेलमध्ये आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

राजस्थानमधील उदयपूर येथे परशुराम चौकात असलेल्या कासा गोल्ड हॉटेलमध्ये एका तरुणीची हत्या करण्यात आली आहे. तिचा मृतदेह हॉटेलच्या एका खोलीत आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणीच्या हत्येचा आरोप तिच्या प्रियकरावर आहे. प्रियसीचा खून केल्यानंतर त्याने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. शिवाय त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणी आणि तिचा प्रियकर दोघेही एकत्र हॉटेलमध्ये आले होते. तरुणीच्या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हिरण मगरी पोलिस ठाण्याचे अधिकारी भरत योगी यांनी सांगितले की, आज पहाटे 4-5 च्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की परशुराम चौकातील कासा गोल्ड हॉटेलमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळला आहे. पोलिस आणि एफएसएल (Forensic Science Laboratory) पथक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना हॉटेलच्या रूम नंबर 108 मध्ये तरुणी पडलेली दिसली. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते. तिच्या डोक्याला गंभीर दुखापतीच्या खुणा आढळल्या.  तिची हत्या करण्यात आल्याचे ही निष्पन्न झाले.

ट्रेंडिंग बातमी - Pune News: पुण्यातील 'ही' पर्यटन स्थळं पुढील 3 महिने राहणार बंद

हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता, विजय भोई नावाचा एक मुलगा आणि निकिता द्विवेदी नावाची मुलगी दोघे एकत्र हॉटेलमध्ये आले होते. विजयने तरुणी निकिताची हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. त्याचा मोबाईल बंद होता. पोलिसांनी तपास केला असता, मुलाने स्वतःच्या मनगटाची नस कापून घेतल्याचे समोर आले. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रेंडिंग बातमी - Major Muiz murder :विंग कमांडर अभिनंदन यांना पकडण्याचा दावा करणाऱ्या पाक मेजर मुईझची हत्या

मृत तरुणी उदयपूरमधील ऋषभदेव येथील रहिवासी होती. ती विजय भोईसोबत हॉटेलमध्ये आली होती. पोलिसांनी पुढील तपास केला असता, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते हे समोर आले. तरुणीचा साखरपुडा झाला होता. यानंतर प्रियकराने प्रेमिकेला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. हॉटेलमध्ये दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात प्रियकराने प्रेमिकेचे डोके भिंतीवर आपटले, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement