जाहिरात

Major Muiz murder :विंग कमांडर अभिनंदन यांना पकडण्याचा दावा करणाऱ्या पाक मेजर मुईझची हत्या

फेब्रुवारी 2019 मध्ये मोईझ अब्बासचे नाव त्यावेळी सर्वाधिक चर्चेत आले होते.

Major Muiz murder :विंग कमांडर अभिनंदन यांना पकडण्याचा दावा करणाऱ्या पाक मेजर मुईझची हत्या

पाकिस्तान लष्कराच्या स्पेशल सर्विस ग्रुपचा (Special Service Group) मोठा अधिकारी असलेल्या मेजर मुईझ (Major Muiz) यांच्या मृत्यूची बातमी समोर  येत आहे. दक्षिण वझिरीस्तानमध्ये टीटीपीने (Tehrik-i-Taliban Pakistan) मेजर मुईझला ठार मारल्याचा दावा केला आहे. खरं तर, मोईझ अब्बास हा तोच पाकिस्तानी अधिकारी आहे, ज्यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये भारतीय वायुसेनेचे पायलट विंग कमांडर अभिनंदन (Wing Commander Abhinandan) यांना पकडल्याचा दावा केला होता. पाकिस्तानच्या फायटर जेट्सची घुसखोरी थांबवताना अभिनंदन यांचे लढाऊ विमान पाकिस्तानात कोसळले होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मोईझ अब्बास कोण होता?
फेब्रुवारी 2019 मध्ये मोईझ अब्बासचे नाव त्यावेळी सर्वाधिक चर्चेत आले, जेव्हा भारतीय पायलट अभिनंदन यांना त्यांनेच पकडल्याचा दावा करण्यात आला. यानंतर मोईझ अब्बासने अनेक मुलाखतीही दिल्या होत्या. त्यात अभिनंदनशी त्याची भेट कोणत्या परिस्थितीत झाली हे सांगितले होते. पाकिस्तानी मीडिया डॉननुसार, खैबर पख्तूनख्वाच्या दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्यात एका गुप्तचर-आधारित ऑपरेशन (Intelligence-Based Operation - IBO) दरम्यान मुईझचा मृत्यू झाला.

ट्रेंडिंग बातमी - श्रावण महिन्यात तुमच्या राशी नुसार करा 12 ज्योतिर्लिंग दर्शन, नक्कीच बदलेल तुमचं नशिब

अभिनंदनचे मिग झाले होते क्रॅश
फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट हवाई हल्ल्याच्या (Balakot Airstrike) वेळी पाकिस्तानसोबत झालेल्या हवाई चकमकीदरम्यान अभिनंदन शत्रूच्या लढाऊ विमानाशी लढत होते. शत्रूबरोबरच्या डॉगफाइट (Dogfight) दरम्यान त्यांचे मिग 21 (MiG 21) विमानही कोसळले. त्यानंतर पाकिस्तानने त्यांना पकडले होते. पाकिस्तानने तीन दिवस अभिनंदन यांना आपल्या ताब्यात ठेवले होते. मात्र त्यानंतर त्यांना सुखरूप भारतात पाठवण्यात आले होते. त्यावेळी अभिनंदन विंग कमांडर होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com