Shocking : शरीरावर जखमा, अन् अंतर्वस्त्रे गायब; IT कंपनीच्या महिला मॅनेजरनं सांगितलं CEO नं कारमध्ये काय केलं?

Udaipur IT Company Gangrape Case: जीकेएम आयटी कंपनीचा सीईओ जितेश प्रकाश सिसोदिया, कंपनीची एक्झिक्युटिव्ह हेड शिल्पा सिरोही आणि तिचा पती गौरव सिरोही या तिघांनी मिळून हे कृत्य केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Udaipur IT Company Gangrape Case: या घटनेत धक्कादायक खुलासे समोर येत असून पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली आहे
मुंबई:

Udaipur IT Company Gangrape Case:  राजस्थानमधील उदयपूर येथे एका आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर कारमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेत धक्कादायक खुलासे समोर येत असून पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली आहे. जीकेएम आयटी कंपनीचा सीईओ जितेश प्रकाश सिसोदिया, कंपनीची एक्झिक्युटिव्ह हेड शिल्पा सिरोही आणि तिचा पती गौरव सिरोही या तिघांनी मिळून हे कृत्य केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, या तिघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.

नेमकं काय घडलं?

या प्रकरणातील वैद्यकीय तपासणी अहवालातून बलात्काराच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. या अहवालात पीडितेच्या खाजगी भागांवर आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्याचे तसेच तिला प्रचंड वेदना होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पीडितेने पोलीस तक्रारीत असेही म्हटले आहे की, घटनेनंतर तिचे काही दागिने, मोजे आणि अंतर्वस्त्रे गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. ही घटना 20 डिसेंबर रोजी घडली असून त्यानंतर पीडितेने पुराव्यासह पोलिसांकडे धाव घेतली.

20 डिसेंबर रोजी उदयपूरमधील शोभापुरा येथील एका हॉटेलमध्ये जितेश सिसोदिया याच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. रात्री 9 वाजता सुरू झालेली ही पार्टी पहाटे 1.30 वाजेपर्यंत चालली. या पार्टीत पीडितेसह सर्वांनीच मद्यप्राशन केले होते. रात्री दीडच्या सुमारास जेव्हा पीडितेची तब्येत बिघडू लागली, तेव्हा जितेश, शिल्पा आणि गौरव यांनी तिला घरी सोडण्याचा प्रस्ताव दिला. कारमध्ये बसल्यानंतर काही वेळातच तिच्यावर अत्याचार करण्यात आले.

(नक्की वाचा : Nagpur News : मित्राचं लग्न ठरलं, पार्टी झाली पण 'तो' परतलाच नाही; 11 मित्रांचा बेजबाबदारपणा CCTV मध्ये कैद )

दुकानापाशी कार थांबवली....

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एकाच्या मालकीची असलेली कार गौरव चालवत होता, तर शिल्पा, जितेश आणि पीडिता मागच्या सीटवर बसले होते. प्रवासादरम्यान आरोपींनी एका दुकानापाशी कार थांबवून सिगारेटसारखा दिसणारा एक पदार्थ विकत घेतला आणि तो पीडितेला दिला. तो पदार्थ सेवन केल्यानंतर पीडिता बेशुद्ध झाली. बेशुद्ध अवस्थेतच तिच्यावर कारमध्ये अत्याचार करण्यात आले.

Advertisement

शुद्धीवर आल्यानंतर पीडितेच्या शरीरावर जखमांचे निशाण दिसले. तिने कारमधील डॅशकॅम तपासला असता त्यामध्ये या गुन्ह्याचे संपूर्ण रेकॉर्डिंग सापडले. या कॅमेरामध्ये आरोपींमधील संभाषण आणि त्यांच्या कृत्याचे चित्रण झाले होते. हे पुरावे घेऊन पीडितेने 23 डिसेंबर रोजी पोलिसात तक्रार दाखल केली.

( नक्की वाचा : Latur News : एक चूक आणि... रात्रभर पोलिसांच्या वाहनात काय घडायचं? लातूरच्या तरुणानं VIDEO करत संपवलं आयुष्य )

या तक्रारीच्या आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी जितेश सिसोदिया, शिल्पा सिरोही आणि गौरव सिरोही यांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement