Akola News: अकोट रेल्वे स्थानकावर तुफान राडा, महिलेसोबत असलेल्या व्यक्तीसोबत भयंकर घडलं, प्रवाशांमध्ये घबराट

अकोल्याच्या अकोट येथे कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेलं अकोट रेल्वे स्थानक सध्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola Crime News Today

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akot Railway Station Crime News Today : अकोल्याच्या अकोट येथे कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेलं अकोट रेल्वे स्थानक सध्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. अकोट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर एका महिलेसोबत असलेल्या व्यक्तीला काही जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा  घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे स्थानकातील सुरक्षेचा प्रेश्न ऐरणीवर आला आहे. स्थानकावर उपस्थित असलेल्या काही लोकांनी या मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आणि तो व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला. 

सुरक्षा यंत्रणेचा अभाव; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

अकोल्याच्या अकोट रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणेचे तीनतेरा वाजल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. स्थानकावर सुरक्षारक्षकांचे कायमस्वरुपी कार्यालय नसल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दल (RPF) किंवा जीआरपी पोलिसांची नियमित गस्त होत नसल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भरदिवसा प्लॅटफॉर्मवरच एखाद्या व्यक्तीला बेदम मारहाण होत असेल,तर रात्रीच्या वेळी सामान्य प्रवाशांनी सुरक्षित प्रवास कसा करायचा? असा संतप्त सवाल नागरिक आणि प्रवासी उपस्थित करत आहेत. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

नक्की वाचा >> Nashik News नाशिक हादरलं! कोर्टासमोरच दहावीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याने केला प्राणघातक हल्ला, पालक भयभीत

प्रशासनाकडून चौकशीची मागणी; RPF आणि GRP काय कारवाई करणार?

यादरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अकोट रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था का नाही, तसेच अशा घटना रोखण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे,याबाबत नागरिकांनी चौकशीची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते,रेल्वे प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थानकावर जाऊन चौकशी करणे आवश्यक आहे. स्थानक परिसरातील रिक्षाचालक, दुकानदार किंवा प्रत्यक्षदर्शी प्रवाशांकडून माहिती घेतल्यास या मारहाणीच्या घटनेचे कारण आणि येथे सुरू असलेल्या गैरप्रकारांचा पर्दाफाश होऊ शकतो. आता या घटनेनंतर तरी रेल्वे संरक्षण दल आणि जीआरपी पोलिस झोपेतून जागे होणार का? तसेच दोषींवर कडक कारवाई होणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.