राहूल वाघ, प्रतिनिधी
Nashik Crime News Today : नाशिकमध्ये एका दहावीच्या विद्यार्थ्यावर भर दिवसा परीक्षा केंद्राच्या बाहेरच धारधार शस्त्राने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रहेनुमा उर्दू स्कूल येथे दहावीत शिकणारा विद्यार्थी नाशिकच्या सी.बी.एस.परिसरात परीक्षा केंद्रावर पेपर देण्यासाठी गेला होता.त्यावेळी ही भयंकर घटना घडल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 9 मार्च 2026 रोजी पीडित मुलगा आणि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट स्व. रत्नप्रभाकर वैशंपायन कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परीक्षा केंद्र येथे काही विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणाहून भांडण झाले होते.त्यानंतर आज पीडित मुलगा दहावीचा पेपर संपल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर आला. त्यावेळी 10-15 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला.विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या अगदी समोरच ही घटना घडली.
नक्की वाचा >> Shirdi News : साईभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! 15 दिवसानंतर साईबाबा संस्थानमध्ये होणार मोठा बदल?
जखमी झालेल्या दोघांनाही रुग्णालयाक केलं दाखल
विद्यार्थ्याच्या डोक्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. अन्य एक विद्यार्थी या हल्ल्यात जखमी झाला आहे.या दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.शहराच्या मध्यभागी असलेल्या परीक्षा केंद्राबाहेर अशी घटना घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.एकूणच हे प्रकरण पाहता शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भद्रकाली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world