एक धक्कादायक आणि तेवढीच काळजी करणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी इतकी भयंकर आहे की तुम्हालाही चिड आल्या शिवाय राहाणार नाही. ही घटना उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात घडली आहे. इथं एक विवाहीत महिला होती. तिला 3 मुलं ही होती. पण तिचे विवाहबाह्य संबंध गावातल्याच एका तरुणीसोबत होते. या संबंधातून ती गरोदरही राहीली होती. तिचा आपल्या प्रियकरावर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे तिने त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. पोटात असलेलं बाळ तुझंच आहे ही ते त्याला वारंवार सांगत होती. शेवटी 3 मुलांसह दोघांनीही पळून जाण्याचा प्लॅन तयार केला. पण पुढे जे काही घडलं ते सर्वांनाच हादरवून सोडणारं होतं.
धक्कादायक घटनाक्रम
सिद्धार्थनगर जिल्ह्यातील बांसी येथे राहणाऱ्या प्रीती (नाव बदललेले) आहे. या नावाच्या महिलेचे गावात राहणाऱ्या 28 वर्षीय दिलीप कुमार अग्रहरी या तरुणाशी प्रेमसंबंध होते. प्रीतीला तीन मुले होती. तरी ही ती गावातल्या दिलीपच्या प्रेमात होती. त्यांचे विवाहबाह्य संबंध होते. या संबंधातूनच प्रिती गरोदर राहीली होती. ती दिलीपच्या बाळाची आई होणार होती. त्यामुळे प्रीती दिलीपवर सतत लग्नासाठी आणि एकत्र पळून जाण्यासाठी दबाव आणत होती.
लग्नाचा हट्ट अन् भयंकर शेवट
प्रेयसीचा लग्नाचा सततचा आग्रह दिलीपला असह्य झाला. यातूनच त्याने प्रीतीची कायमची सुटका करण्याची भयानक योजना आखली. त्याने लग्नासाठी पळून जाण्याचे नाटक करून प्रीतीला लहान मुलासह बस्ती येथे बोलावले. दिलीपने सांगितल्या प्रमाणे ती आपल्या लहान मुलाला घेवून दिलीप बरोबर पळून जाण्यासाठी निघाली. पण संधी मिळताच दिलीपने धारदार शस्त्राने प्रीतीच्या गळ्यावर वार करून तिची निर्घृण हत्या केली. खून केल्यानंतर आरोपी दिलीपने गुन्ह्याला वेगळे वळण देण्यासाठी मृतदेहाचे कपडे फाडले आणि घटनास्थळी दारू तसेच पाण्याच्या बाटल्या टाकल्या.
बलात्काराचा बनाव
हे त्याने सर्व याच्यासाठी केले जेणेकरून पोलिसांना बलात्कारानंतर हत्या झाली आहे असे वाटेल. हत्येनंतर तो तिच्या लहान मुलाला रडताना तिथेच सोडून पळून गेला. एका स्थानिकाने त्या मुलाला पाहून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून, CCTV फुटेज आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर आरोपी दिलीप अग्रहरीला अटक केली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्काराची पुष्टी झाली नाही. केवळ प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंधातून आलेली गर्भधारणा हेच हत्येमागील मुख्य कारण असल्याचे उघड झाले आहे.