जाहिरात

D Mart News: डी मार्टमध्ये 'या' दिवशी मिळतं सर्वात स्वस्त सामान, त्यामागचं कारणं ऐकून तुम्ही ही खूश व्हाल

त्यामुळे त्या दिवशी तुम्ही जर का खरेदीसाठी डी मार्टमध्ये गेलात तर त्या दिवशी तुमची मोठी बचत होवू शकते.

D Mart News: डी मार्टमध्ये 'या' दिवशी मिळतं सर्वात स्वस्त सामान, त्यामागचं कारणं ऐकून तुम्ही ही खूश व्हाल
मुंबई:

डी-मार्ट (DMart) हे कोणाचे ही खरेदीलसाठी अत्यंत लोकप्रिय ठिकाणी. मग तो  सर्व सामान्य असो की मध्यमवर्गीय त्यांची खरेदी करण्याची पसंती ही डी मार्ट असते. श्रीमंत वर्गातले लोक ही डी मार्टमधून खरेदी करण्यास प्राधान्य देतात. एकाच ठिकाणी सर्व काही आणि ते ही माफक दरात त्यामुळे डी मार्ट आपोआप सर्वांना आपल्याकडे आकर्षित करते. किराणा, कपडे आणि घरगुती वस्तू MRP पेक्षा कमी किमतीत मिळत असल्याने येथे खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी होत असते. पण जर का तुम्ही काही मोजक्या दिवशी डी मार्टमध्ये खरेदी करण्यासाठी जाल तर तुम्ही फायद्यात राहाला. असे दिवस कोणते हे आपण जाणून घेणार आहोत.  

डी-मार्टमध्ये तसे रोजच काही ना काही वस्तूंवर सवलत असते. पण आठवड्यातील काही असे दिवस आहेत जे खरेदीसाठी खास ठरतात. या दिवशी बहुतांश वस्तू बाजारभावापेक्षा कमी दरातच उपलब्ध असतात. तरीही, मोठी बचत आणि Buy One Get One म्हणजेच एक घेतल्यास एक मोफत सारख्या खास ऑफर्स सणासुदीच्या काळात किंवा आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत जास्त दिसतात. त्यामुळे त्या दिवशी तुम्ही जर का खरेदीसाठी डी मार्टमध्ये गेलात तर त्या दिवशी तुमची मोठी बचत होवू शकते. 

नक्की वाचा - CIDCO News: सिडको घरांच्या किंमती जाहीर, पण ऑनलाइन अर्ज नोंदणी करताना येतोय मेजर प्रॉब्लेम

शुक्रवार हा त्या पैकी एक दिवस आहे.  सेलची दमदार सुरुवात याच दिवशी शक्यतो केली जाते. नवीन सेलची सुरुवात शक्यतो शुक्रवारपासून होते असं सांगितलं जातं. या दिवशी किराणामाल, तेल, डाळी, आणि साबण यांचा स्टॉक भरपूर असतो. गर्दी तुलनेने कमी असल्याने तुम्हाला आवडीचे ब्रँड सहज मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बरेच लोक हे शुक्रवारी डी मार्टमध्ये खरेदी करण्यास प्राधान्य देत असतात. 

नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय

त्यानंतरचा दिवस आहे तो म्हणजे शनिवार.'पीक डे' आणि कॉम्बो ऑफर्स शनिवारी असतात. हा डी-मार्टचा पीक डे असतो. सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत मोठी गर्दी होते. परंतु, याच दिवशी 50% ऑफ आणि आकर्षक कॉम्बो पॅक ऑफर्स सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध असतात. तर रविवार हा विकेंडचा शेवटचा दिवस असल्याने, काही निवडक उरलेल्या स्टॉकवर (जसे की भाज्या, फळे आणि दूध पावडर) अतिरिक्त 10% ते 20% पर्यंत सूट मिळू शकते. मोठी खरेदी करायची असल्यास दिवाळी, दसरा यांसारखे सणांचे दिवस सर्वाधिक फायदेशीर ठरतात. तसेच, DMart Ready ॲप वापरत असाल तर सोमवार किंवा बुधवार या दिवशी विशेष ऑनलाइन डील्स आणि कूपन्स मिळू शकतात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com