UP Crime: कुटुंबाचा विरोध झुगारुन प्रेमविवाह केलेल्या जोडप्याच्या सुखी संसाराचा भयंकर शेवट झाल्याची हादरवणारी घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून समोर आली आहे. कानपुरमधील महाराजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सचिन सिंह या तरुणाने पत्नीची निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे तो स्वत: पोलीस स्थानकात हजर झाल्याने एकच खळबळ उडाली. चारित्र्याच्या संशयातून हे भयंकर कांड झाल्याचे समोर आले आहे.
प्रेमविवाहाचा भयंकर शेवट..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सचिन सिंग आणि श्वेता हे दोघेही मूळचे फतेहपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. कुटुंबाचा विरोध झुगारून त्यांनी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ सुरतमध्ये घालवल्यानंतर ते कानपूरला स्थायिक झाले होते. सचिन रिक्षा चालवण्याचे काम करत होता. दोघांचा संसार सुखाने सुरु असतानाच सचिनला आणि श्वेतामध्ये खटके उड लागले. आपल्या बायकोचे बाहेर अफेयर आहे, असा त्याला संशय होता.
पत्नी श्वेताच्या अकाऊंटमध्ये वारंवार पैसे यायचे. याबद्दल विचारल्यास आजीने पाठवलेत असं ती सांगायची. मात्र त्यांच्या घरासमोर इंजिनियरिंगचे विद्यार्थी राहत होते, त्यांच्यावर त्याला संशय होता. आपल्या पत्नीचे बिंग फोडण्यासाठी त्याने एक प्लॅन केला. त्याने पत्नीला फोन करुन मित्रांसोबत पार्टी करत आहे, आज रात्रभर घरी येणार नाही, असं सांगितले. त्यानंतर तो मध्यरात्री घरी पोहोचला.
पत्नीला न कळवता घरी आल्यानंतर समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमिन सरकली. त्याची पत्नी समोर राहणाऱ्या दोन तरुणांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडली. त्यानंतर त्याने मोठा गोंधळ घातला. शेजाऱ्यांनी आवाज ऐकून तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत सर्वांना स्थानकात नेले आणि समज देऊन सोडून दिले.
गळा दाबून हत्या केली...
घरी परतल्यानंतर दोघांमधील वाद वाढला. पत्नी श्वेताने पतीलाच धमकावण्यास सुरुवात केली. तु त्या मुलांना काही केलेस तर मी त्या तिघांसोबत राहीन असं ती म्हणाली. याच रागातून सचिनने तिचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर तो घटनास्थळावरुन पळून गेला. हत्येनंतर तो काही तास शहरात भटकत होता, मात्र पश्चात्ताप झाल्याने शनिवारी सकाळी त्याने महाराजपूर पोलीस ठाणे गाठले. "साहब, मी माझ्या पत्नीला संपवले आहे, तिचा मृतदेह घरातच आहे," अशी कबुली त्याने दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.