जाहिरात

UP News : 10 वर्षात DCP झाले कोट्यधीश; उत्पन्नाचा आकडा पाहून हादरला...आता थेट निलंबन

ही मालमत्ता ऋषिकांत शुक्ला, त्यांचे कुटुंब आणि जवळच्या सहकाऱ्यांच्या नावे आढळून आली आहे.

UP News : 10 वर्षात DCP झाले कोट्यधीश; उत्पन्नाचा आकडा पाहून हादरला...आता थेट निलंबन
(फाइल फोटो)
  • यूपी के एक पुलिस अधिकारी डीएसपी ऋषिकांत शुक्ला को अवैध कमाई के आरोप में निलंबित कर दिया गया है
  • विजिलेंस जांच में ऋषिकांत शुक्ला के परिवार और करीबियों के नाम करीब सौ करोड़ की संपत्ति मिली है
  • ऋषिकांत शुक्ला कानपुर में करीब दस सालों तक तैनात रहा और अखिलेश दुबे के करीबी संबंध थे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

उत्तर प्रदेशातील एका पोलीस अधिकाऱ्याला बेकायदेशीर उत्पन्नाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलं आहे. कानपूरमध्ये दीर्घकाळ डीएसपी म्हणून कार्यरत असलेले ऋषिकांत शुक्ला यांच्यावर कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. दक्षता तपासात असे दिसून आले आहे की पोलीस अधिकारी ऋषिकांत शुक्ला यांच्याकडे अंदाजे १०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

ही मालमत्ता ऋषिकांत शुक्ला, त्यांचे कुटुंब आणि जवळच्या सहकाऱ्यांच्या नावे आढळून आली आहे. ऋषिकांत शुक्ला कानपूरमध्ये सुमारे १० वर्षे तैनात होते आणि या काळात त्यांचे अखिलेश दुबे यांच्याशी खूप जवळचे संबंध होते. असे मानले जाते की, ऋषिकांत शुक्ला, अखिलेश दुबे यांच्यासोबत मिळून खोटे खटले दाखल करणे, खंडणी आणि जमीन हडप करणे यासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होते.

Latest and Breaking News on NDTV

सध्या मैनपुरीमधील तैनात ऋषिकेश शुल्कालाल निलंबित करण्यात आलं आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com