Nanak Deen Bhurji dies: उत्तर प्रदेशमधील राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. उत्तरप्रदेशमधील भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी राज्यमंत्री नानक राम भुर्जी यांच्या संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 28 जुलै रोजी लखनऊनमध्ये आमदार निवासाच्या सातव्या मजल्यावरुन पडून त्यांचा मृत्यू झाला.
भाजप नेत्याच्या मृत्यूने खळबळ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजप ओबीसी मोर्चाशी संबंधित ज्येष्ठ नेते आणि २००६ मध्ये स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री नानकदिन भुर्जी यांचा लखनौमधील नवीन आमदार निवासस्थानाच्या सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नानकदिन भुर्जी हे सुभाष्पा मतदारसंघाचे आमदार हंसू राम यांच्या ३५७ बेलथरा रोड येथील निवासस्थानी आले होते.
त्यांनी आमदारांच्या प्रतिनिधीला कॉफी बनवण्यास सांगितले. जेव्हा प्रतिनिधी कॉफी घेऊन परत आला, तेव्हा भुर्जी खोलीत नव्हते. थोड्याच वेळात, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ते जिन्यावरून खाली पडल्याची माहिती दिली. पोलिसांना माहिती देण्यात आली आणि त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. हा अपघात होता, आत्महत्या होती की आणखी काही कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सर्व संभाव्य बाबींचा तपास करत आहेत.
नानकदीन भुरजी हे मागासवर्गीय राजकारणात दीर्घकाळ सक्रिय होते. २००६ मध्ये, समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये त्यांची स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांना मुलायम सिंह यादव यांचे जवळचे सहकारी मानले जात होते. २००९ मध्ये, ते भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झाले, त्यानंतर ते भाजपच्या मागासवर्गीय (ओबीसी) मोर्चात सामील झाले आणि संघटनेत सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी 'हिंदुस्तान पिछडा मोर्चा' नावाची संघटनाही स्थापन केली, ज्याचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. सातव्या मजल्यावरून त्यांचे पडणे हा अपघात होता, आत्महत्या होती की आणखी काही कारण होते, हे केवळ शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासातूनच निश्चित होईल.
Maharashtra Rain: सावधान! राज्यभर तुफान पाऊस बरसणार, 'या' तारखा लक्षात ठेवा; प्रशासन अलर्ट
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world