जाहिरात

Shocking News:18 वर्षांची मुलगी अन् 42 वर्षांचा पुरुष; एका वर्षाच्या लिव्ह-इननंतर 'त्या' खोलीत नेमकं काय घडलं?

Shocking News : गेल्या काही दिवसांपासून पुष्पाचा तिच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नव्हता. मुलगी फोन उचलत नसल्याने तिचे वडील महावीर लोधी यांना शंका आली.

Shocking News:18 वर्षांची मुलगी अन् 42 वर्षांचा पुरुष; एका वर्षाच्या लिव्ह-इननंतर 'त्या' खोलीत नेमकं काय घडलं?
Shockin News : पोलिसांनी खाक्या दाखवताच गंगासागरने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली.
मुंबई:

18 वर्षांच्या तरुणीची तिच्याच लिव्ह-इन पार्टनरने हत्या केली आहे. हत्या करणाऱ्या 42 वर्षीय आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आधी अपघाताचा बनाव रचला, मात्र घटनेच्या महिनाभरानंतर पोलिसांनी या संपूर्ण गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील थरियांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औरेई गावात ही घटना घडली आहे. मृत तरुणीचे नाव पुष्पा देवी (वय 18) असे असून ती गावातीलच 42 वर्षीय गंगासागर याच्यासोबत गेल्या 1 वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. गंगासागरच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर त्याने पुष्पा देवीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी कोर्ट मॅरेज केले होते आणि नोव्हेंबर महिन्यापासून दोघेही राधानगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते.

गेल्या काही दिवसांपासून पुष्पाचा तिच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नव्हता. मुलगी फोन उचलत नसल्याने तिचे वडील महावीर लोधी यांना शंका आली. त्यांनी तातडीने राधानगर पोलीस ठाण्यात धाव घेत गंगासागर याच्यावर संशय व्यक्त केला. गंगासागरनेच आपल्या मुलीची हत्या करून मृतदेह लपवला असावा, अशी तक्रार त्यांनी पोलिसांत नोंदवली.

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणची शिक्षिका रहस्यमयरित्या गायब, 4 दिवसांनी सापडला मृतदेह; पोलिसांनी असा लावला हत्येचा शोध )
 

हत्या करून 3 दिवस घरातच ठेवला मृतदेह

वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गंगासागरला ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याने हत्येची कबुली दिली. आरोपीने हत्येनंतर पुष्पाचा मृतदेह तब्बल 3 दिवस घरातच लपवून ठेवला होता. यानंतर आपल्या 3 साथीदारांच्या मदतीने मृतदेह ट्रॅक्टरमध्ये टाकला आणि रेल्वे ट्रॅकवर नेऊन फेकून दिला, जेणेकरून ही हत्या नसून अपघात किंवा आत्महत्या वाटेल.

29 जून रोजी पोलिसांना रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडला होता. त्यावेळी ओळख पटू न शकल्याने पोलिसांनी तो बेवारस अंत्यसंस्कार केले होते. मात्र गावात अचानक या हत्येची चर्चा सुरू झाली आणि वडिलांनी व्यक्त केलेल्या संशयावरून तपासाची चक्रे वेगाने फिरली. पोलिसांनी खाक्या दाखवताच गंगासागरने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली.

( नक्की वाचा : Akola News: जेलमधील पहाऱ्यातून निसटला अन् थेट विहिरीत...;अकोला कारागृहातील घटनेने पोलिसांची झोप उडवली! )

तीन आरोपी गजाआड, एक अजूनही फरार

या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी गंगासागरसह त्याच्या 2 साथीदारांना अटक केली आहे. गुन्हा करण्यासाठी वापरलेला ट्रॅक्टर आणि एक बाईकही पोलिसांनी जप्त केली आहे. या कटात सामील असलेला चौथा आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com