जाहिरात

Love story: जावया बरोबर पळून गेलेली सासू आली परत, प्रेम प्रकरणात नवा ट्वीस्ट

गावात सासू आणि जावयी पळून गेल्यानंतर बोंबाबोंब झाली होती. सोशल मीडियावर तर या बातमीने धुमाकुळ घातला होता.

Love story: जावया बरोबर पळून गेलेली सासू आली परत, प्रेम प्रकरणात नवा ट्वीस्ट

मुलीचं लग्न ज्या वक्ती बरोबर ठरलं होतं. त्याच व्यक्ती बरोबर म्हणजेच होणाऱ्या जावया बरोबर मुलीची आईच रफुच्चक्कर झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर होणाऱ्या जावया बरोबरच सासू पळाली ही बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायर झाली. ही घटना उत्तर प्रदेशातल्या अलिगढमध्ये घडली होती. मुलीच्या लग्नाला दहा दिवश शिल्लक असतानाच सासू आणि जावई पळून गेले. पण मुलीच्या लग्नाच्याच दिवशी म्हणजे 10 दिवसानंतर हे दोघेही परतले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रेम प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राहुल आणि सपना यांची लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. सपना हिच्या 18 वर्षाच्या मुली बरोबर राहुल याचे लग्न ठरले होते. पण लग्न होण्या आधी राहुलचे सुत मुली ऐवजी सासू बरोबरच जुळले. होणाऱ्या बायको पेक्षा जावयाला सासूच पसंत पडली. सासू ही जावयाच्या प्रेमात लट्टू  झाली. प्रेमात हे दोघे इतके अखंड बुडाले की त्यांना आपल्या नात्याचाही विसर पडला. प्रेमात काहीच दिसत नाही अगदी तसं या दोघां बरोबर झालं. अलिगढच्या मोहनपुरा गावातली ही घटना आहे. या गावात राहाणारी सपना आपल्या जावया बरोबर चक्क पळून गेली. 6 एप्रिलला तिने घर सोडले. एकीकडे मुलगी लग्नाची स्वप्न बघत होती त्याच वेळी तिच्या होणाऱ्या नवऱ्या बरोबर मुलीची आईच पळून गेली होती. 

ट्रेंडिंग बातमी - Uddhav Thackeray: लोकसभेला जिंकलो विधानसभेला का हरलो? उद्धव ठाकरेंनी आतली चर्चा उघड केली

पण इथेच सर्व काही संपलं नव्हतं. खरा क्लायमॅक्स पुढे होता. गावात सासू आणि जावयी पळून गेल्यानंतर बोंबाबोंब झाली होती. सोशल मीडियावर तर या बातमीने धुमाकुळ घातला होता. अशातच 16 तारखेला जावई आणि सासू हे दोघे ही जवळपास 10 दिवसानंतर स्वत: पोलिस स्टेशनला हजर झाले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावरचा पडदा उठला. सपना म्हणजे  राहुलची सासू यांच्या पहिले मोबाईलवर संभाषण झालं. ते पुढे वाढत गेलं. तिचा नवरा सतत दारू पित होता. शिवाय तिला मारहाण ही करत होता. त्यामुळे ती हैराण झाली होती. पण त्याच वेळी राहुलने तिला आधार दिला. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं. मुलगी बाजूलाच राहीली. शेवटी सपनाने जावयाबरोबर पळून जाण्याचा निर्णय घेतला. घरातले साडेतीन लाख रुपये आणि पाच लाखाचे दागिने घेवून ती जावया बरोबर पळाली. 

ट्रेंडिंग बातमी - Political news: पुण्यात कार्यक्रम, फडणवीस- शिंदेंना निमंत्रण, अजित पवारांना मात्र नो एन्ट्री

दोघे ही एकमेकाच्या प्रेमात होते. कुठे तरी जावून संसार थाटायचा असं त्यांनी ठरवलं होतं. त्या दुष्टीने गावातून पळाल्यानंतर ते अलीगढ वरून कासगंज, बरेली, तिथून  बिहारच्या  मुजफ्फरपूर पर्यंत ते पोहचले असं राहुल याने पोलिसां समोर सांगितलं. त्यावेळी त्यांनी त्यांचा बंद केलेला मोबाईल सुरू केला. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांना त्यांचेच फोटो आणि बातम्या पाहायला मिळाल्या. या सर्व बातम्या पाहून ते दोघेही चकीत झाले. या सगळ्या गोष्टी पाहून त्या दोघांनीही परत गावाला गेलं पाहीजे असा निर्णय घेतला. तिथून ते एका भाड्याच्या गाडीतून गावात परतले. विशेष म्हणजे ज्या दिवशी लग्न होणार होते त्याच दिवशी ते दोघे परत आले होते. लग्न मुलगी अनिता राणी बरोबर होणार होते पण नवरी बवून तिची आईच गावात परतली. दरम्यान त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: