प्रेम आंधळं असतं, असं सर्रास सांगितलं जातं. या संकल्पनेवर आधारित अनेक पुस्तकं, चित्रपट आहेत. त्यामध्ये या गोष्टीचं उदात्तीकरण करण्यात आलं आहे. पडद्यावर दिसणाऱ्या, पुस्तकात वाचलेल्या घटनांपेक्षाही अकल्पित अशी गोष्ट कधी-कधी प्रत्यक्षात घडते. त्यावेळी त्यावर विश्वास ठेवणं हे अवघड होतं. असं कसं काय होऊ शकतं? हा विचार सर्वजण करु लागतात. त्यावर 'प्रेम आंधळं' असतं हेच उत्तर समोरच्याकडून मिळतं. असाच एक प्रकार उघड झालाय.
( )
भिकाऱ्याच्या प्रेमात पडली 6 मुलांची आई
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील हा प्रकार आहे. या घटनेत 6 मुलांची आई असलेली 36 वर्षांची महिला चक्क भिकाऱ्याच्या प्रेमात पडली. ती त्याच्या प्रेमात इतकी बुडाली की सर्व मुलं आणि संसार वाऱ्यावर सोडून त्याच्यासोबत पळून गेली आहे. या महिलेच्या पतीनंच याबाबतची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली आहे. आपल्या पत्नीला शोधण्याची विनंती पीडित पतीनं केली आहे. पत्नी घरातील पैशांसह पसार झाली आहे, असंही त्यानं तक्रारीत म्हंटलं आहे.
राजू असं या पीडित पतीचं नाव आहे. राजूच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या 87 कलमानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.
( नक्की वाचा : Love Story : 20 दिवस पत्नीसोबत तर 10 दिवस किन्नरसोबत राहणार तरुण, प्रेमासाठी काढला तोडगा )
काय आहे Love Story?
राजूनं केलेल्या तक्रारीनुसार नन्हे पंडीत असं या प्रकरणातील आरोपी भिकाऱ्याचं नाव आहे. तो त्यांच्या परिसरात नियमित भीक मागण्यास येत असे. त्याचवेळी राजेश्वरीशी त्याची ओळख झाली. ते दोघं एकमेंकांशी फोनवर देखील बोलत असतं, असं राजूनं सांगितलं.
3 जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास राजेश्वरीनं माझी मुलगी खुशबूला आपण बाजारात भाजी आणि कपडे घेण्यासाठी जात असल्यां सांगितलं. त्यानंतर ती परत आली नाही. मी तिचा सर्वत्र शोध घेतला. पण, मला ती सापडली नाही. मला म्हैस विक्रीतून मिळालेले पैसे घेऊन राजेश्वरी घरातून निघून गेली आहे. नन्हे पंडीतनंच तिला घेऊन गेला असावा, असा मला संशय असल्याचं राजूनं पोलीस तक्रारीमध्ये म्हंटलं आहे.
( नक्की वाचा : प्रेम, धर्मांतर, नशा...वडिलांची संपत्ती न मिळाल्यानं तरुणीचं टोकाचं पाऊल )
काय सांगतो कायदा?
पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय न्याय संहितेच्या कलम 87 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यानुसार, 'कोणत्याही व्यक्तीनं एखाद्या महिलेचं जबरदस्तीनं अपहपण केलं असेल किंवा तिच्या मनाच्या विरोधात तिच्याशी लग्न केलं असेल, तिला जबरदस्तीनं संभोग करण्यासाठी अथवा अवैध संभोगासाठी भाग पाडलं असेल तर त्याला एक विशिष्ट अवधीसाठी शिक्षा होऊ शकते. या शिक्षेची मुदत 10 वर्षांपर्यंत वाढवण्यात येते. त्याचबरोबर त्याला आर्थिक दंडाची तरतूद देखील या कायद्यामध्ये आहे.