केरळधील हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक करण्याच्या घटनांवर आधारारित 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा चांगलाच गाजला आहे. या सिनेमावर काही जणांनी आक्षेप नोंदवले. त्याचवेळी हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचा निर्मात्यांसह अनेकांनी खुलासा केला होता. 'द केरला स्टोरी' सारखीच घटना प्रत्यक्षात घडली आहे.
तरुणीनं त्याच्या प्रियकराच्या दबावात येऊन वडिलांकडं संपत्तीमधील वाटा मागितला. पण, वडिलांनी तो देण्यास नकार दिल्यानंतर तिनं स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली आहे. हा सर्व लव्ह जिहादचा (Love Jihad ) प्रकार आहे, असं या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या तपासानुसार मृत तरुणीचं दुसऱ्या धर्मातील तरुणावर प्रेम होतं. ती दोघं गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. आरोपी तरुणाचं नाव फराज आहे. पोलिसांनी फराजला अटक केलीय. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील हा धक्कादायक प्रकार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फराजनं तरुणीला लग्नाचं वचन देऊन जाळ्यात अडकवलं. तो गेल्या काही वर्षांपासून तिचं शारीरिक शोषण करत होता. रिलेशनशिपमध्ये असताना आरोपीनं तरुणीवर दबाव टाकून अनेकदा पैसे देखील घेतले. फराजनं बळजबरीनं तरुणीला धर्मांतर करायला लावलं, अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.
( नक्की वाचा : 184 जणांचा मृत्यू, हिंदूंचं पलायन... 46 वर्षांपूर्वी काय घडलं होतं? वाचा संभलच्या शिव मंदिराचं सत्य )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं तरुणीला मुस्लीम धर्म स्विकारण्यासाठी तसंच त्यामधील चालीरिती शिकण्यासाठी कुराण आणि हदीसची पुस्तकं दिली. इतकंच नाही तर धर्म बदलण्याबाबत तरुणीचं ब्रेनवॉश करण्यासाठी आरोपीनं तिला शिकवणी देखील लावली होती.
फराजवरील आरोपानुसार त्यानं कथितपणे तरुणीला नमाज पठण करायला देखील शिकवलं. आरोपीच्या दबावामुळे हळूहळू तरुणीचा कल मुस्लीम धर्माकडं झुकू लागला. काही काळातं ती तरुणी घरामध्ये देखील नमाज पठण करु लागली. मुलीला घरी नमाज करताना पाहून तिच्या आजारी वडिलांना मोठा धक्का बसला.
आरोपीनं उकळले पैसे
पोलिसांच्या तपासात या आरोपीनं तरुणीला कशा पद्धतीनं जाळ्यात अडकवलं होतं याबाबतचं सत्य उघड होत आहे. ही तरुणी आरोपी फराजची प्रत्येक गोष्ट ऐकत होती. वडिलांनी मनाई केल्यानंतरही ती तिच्या प्रियकरासोबतच्या भेटी सुरुच होत्या. फराजनं या गोष्टीचा फायदा उठवला. त्यानं हुंड्याच्या नावाखाली वेळोवेळी तिच्याकडून पैसे उकळले. फराजनं जवळपास 6 लाखांपेक्षा जास्त पैसे तरुणीकडून घेतले होते.
( नक्की वाचा : 'भारतीय क्रिकेटपटूचे वडील घेत होते धर्मांतराचे कार्यक्रम', क्लबनं केली खेळाडूवर कारवाई )
तरुणीला लावली ड्रग्जची सवय
पीडित कुटुंबीयानं आरोपी फराजवर त्यांच्या मुलीला ड्रग्जची सवय लावल्याचाही आरोप केलाय. आरोपीनं तरुणीला मंकी ड्रग्जची नशा करण्याची सवय लावली, अशी माहिती पीडित कुटुंबीयांनी पोलिसांनी दिली आहे. फराजच्या संपर्कात असताना आपली मुलगी गर्भवती होती. फराजनं तिला गर्भपात करायला लावला, असा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
या घटनेच्या काही दिवसांपूर्वी आरोपीनं एका हॉटेलमध्ये तरुणाला कुटुंबीयांसोबत लग्नाची बोलणी करण्यासाठी बोलावलं होतं. त्या बोलणीच्या दरम्यान त्यानं लग्नासाठी हुंड्याची मागणी केली. तरुणीच्या हिश्याची वडिलांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती आपल्या नावावर करावी अशी मागणी फराजनं केली. तरुणीच्या कुटुंबीयांनी फराजला संपत्ती देण्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या तरुणीनं आत्महत्या केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world