उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील हरदोई (Hardoi) जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका नवविवाहित तरुणाने लग्नाच्या अवघ्या २५ दिवसांनंतरच आत्महत्या (Suicide) केली आहे. पत्नीसोबत होणारे सततचे वाद आणि तिसऱ्यांदा तिने घर सोडून गेल्यामुळे निराश होऊन तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
बिहारमधून केले होते लग्न..
ही हृदयद्रावक घटना कछौना पोलीस स्टेशन हद्दीतील रंगैयाखेड़ा गावाची आहे. गावातील सुधीर वर्मा जो शेतीचे काम करत होता याने २५ दिवसांपूर्वीच बिहारमधून आशा नावाच्या तरुणीशी लग्न करून तिला गावी आणले होते. मात्र, लग्नानंतर अल्पावधीतच सुधीर आणि आशा यांच्यात सातत्याने वाद-विवाद (Disputes) होत होते, असे कुटुंबीयांनी सांगितले. या वादामुळे आशा यापूर्वीही दोन वेळा कोणालाही न सांगता घर सोडून गेली होती. सुधीर प्रत्येक वेळी समजावून सांगून तिला परत घेऊन येत असे.
Thane News : मैत्रिणीशी झालं भांडण; संतापाच्या भरात तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल
रविवारी आशा पुन्हा एकदा कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेली. पत्नी तिसऱ्यांदा निघून गेल्यामुळे सुधीर रात्रभर तिचा शोध घेत राहिला, पण ती कुठेही सापडली नाही. या सततच्या त्रासाला आणि पत्नीच्या तिसऱ्यांदा निघून जाण्याने आलेल्या निराशेला कंटाळून सुधीरने रात्रीच भयानक निर्णय घेतला. त्याने आपल्या पत्नीच्या साडीचा फंदा बनवून गावाबाहेरील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
पोलिसांकडून कायदेशीर कारवाई सुरू:
सोमवारी सकाळी गावकरी जात असताना त्यांना सुधीरचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. माहिती मिळताच कछौना पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या संदर्भात प्रभारी निरीक्षक प्रेम सागर सिंह यांनी सांगितले की, तरुणाचा पोस्टमॉर्टम करण्यात आला असून, या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
नक्की वाचा - Satara Doctor Death Case : महिला डॉक्टरच्या डायरीत काय दडलंय? अनेक मोठे खुलासे होणार