जाहिरात

Satara Doctor Death Case : महिला डॉक्टरच्या डायरीत काय दडलंय? अनेक मोठे खुलासे होणार

Satara Doctor Death Case: पोस्टमार्टेम करणारे डॉक्टर पीएम नोट लिहित असतात. सध्या ही पद्धत दुर्मीळ झाली आहे. मात्र बदली झाल्यानंतर डॉक्टरांना आधीच्या पोस्टमार्टेमची माहिती असावी यासाठी ही नोट लिहिली जाते.

Satara Doctor Death Case : महिला डॉक्टरच्या डायरीत काय दडलंय? अनेक मोठे खुलासे होणार

Satara Female Doctor Death : साताऱ्यातील फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवनवी माहिती समोर येत आहे. साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी आणि पीडित डॉक्टर तरुणीचे मोबाइल तपासण्यात आले. डॉक्टर तरुणीचे दोन्ही आरोपींसोबत काहीतरी संबंध होते आणि ती नियमितपणे दोघांच्या संपर्कात होती. डॉक्टर तरुणीचे आरोपीसोबतचे चॅटही सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 

नक्की वाचा - Satara Doctor Case: दोघांशीही संबंध, लॉजचा रुमही स्वत: बुक केला, चौकशीत धक्कादायक खुलासे

साताऱ्यातील डॉक्टरची डायरी सापडली

दरम्यान आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. डॉक्टर तरुणीला डायरी लिहिण्याची सवय होती. क्लास वन अधिकाऱ्यांना दैनंदिनी लिहिण्याची सवय असते. डॉक्टर तरुणीही त्या डायरीमध्ये पीएम नोट (पोस्टमार्टेम नोट) लिहित होती. याशिवाय वैयक्तिक माहितीदेखील या डायरीत लिहित होती. त्यामुळे या डायरीमुळे मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढारीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहे. 

नक्की वाचा - डॉक्टर तरुणीची हॉटेलवर बोलावून हत्या? हॉटेल भाजप नेत्याचं; सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप

डॉक्टर तरुणी ही फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत होती. फलटणशिवाय साताऱ्यातील इतर ठिकाणीही वैद्यकीय अधिकारी म्हणून तिने काम पाहिलं आहे. 

पोस्टमार्टेम नोटची आवश्यकता काय असते? 

पोस्टमार्टेम करणारे डॉक्टर पीएम नोट लिहित असतात. सध्या ही पद्धत दुर्मीळ झाली आहे. मात्र बदली झाल्यानंतर डॉक्टरांना आधीच्या पोस्टमार्टेमची माहिती असावी यासाठी ही नोट लिहिली जाते. पीडित डॉक्टर तरुणी नियमितपणे पीएम नोट लिहून ठेवत होती. त्यामुळे यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा: पोलीस ठाण्यापासून 300 मीटर अंतरावर ड्रग्सची फॅक्टरी, आयुक्तांची मोठी कारवाई

खोट्या पीएम रिपोर्टसाठी दबाव...

महिला डॉक्टरच्या भावाने अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. पीडित महिला डॉक्टरवर खोटे पीएम रिपोर्ट देण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला जात होता. तिने अनेकदा याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही राजकीय आणि पोलिसांकडून तिच्यावर दबाव आणला जात होता असा आरोप करण्यात आला आहे. हे आरोप पाहाता साताऱ्यातील मृत महिला डॉक्टरच्या डायरीमुळे मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com