UP Crime: भयंकर रे! मध्यरात्री घरात घुसले, गुप्तांग कापलं अन् घेऊन पळाले; पुढे भयंकर..

UP Crime: या भयंकर घटनेनंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पीडितेचा मुलगा प्रिन्स यादवने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली,

जाहिरात
Read Time: 2 mins

उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यामध्ये वेव्ह सीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भयंकर घटना घडली आहे.  एका डेअरी संचालकाच्या घरात घुसून त्याचे गुप्तांग कापून नेल्याचा प्रकार घडला आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पारो नावाच्या एका तृतीयपंथी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे दरोडेखोरांनी घरात घुसून एका व्यक्तीचा गुप्तांग कापून तो घेऊन गेले. ही संपूर्ण घटना गाझियाबादच्या वेव्ह सिटी पोलिस स्टेशन हद्दीतील लालकुआन परिसरात घडली. काही दरोडेखोरांनी घरात घुसून दुग्धव्यवसाय मालक संजय यादव यांचे गुप्तांग कापले आणि ते घेऊन पळून गेले.

ही घटना 28 फेब्रुवारी रोजी रात्री 11 ते 12 च्या दरम्यान घडली. पीडित संजय यादव, (वय 42) त्यांच्या घरात झोपले होते. तेव्हा 3-4 हल्लेखोर घरात घुसले आणि त्यांना मादक पदार्थाचा वास देऊन बेशुद्ध केले. यानंतर त्यांचे गुप्तांग कापून सोबत घेऊन गेले. या भयंकर घटनेनंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पीडितेचा मुलगा प्रिन्स यादवने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 

ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...

जखमी व्यक्तीला गंभीर अवस्थेत मेरठमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर संकेतांच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. पीडितेच्या मुलाने सांगितले की, पारो नावाच्या ट्रान्सजेंडरच्या सांगण्यावरून तिच्या मैत्रिणींनी हा गुन्हा केला. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे, पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement