खोटं किडनॅपिंगचं शूट सुरु असताना पोहोचले खरे पोलीस, घडवली जन्माची अद्दल

सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी वाट्टेल ते करण्याचं फॅड सध्या वाढलंय

जाहिरात
Read Time: 2 mins
फेक किडनॅपिंगचा व्हिडिओ शूट करणे त्यांना महाग पडलंय.
नोएडा:

सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी वाट्टेल ते करण्याचं फॅड सध्या वाढलंय. लक्षवेधी रिल्स बनवण्यासाठी काही जण कायदा मोडायला देखील घाबरत नाहीत. कधी स्टंट, कधी रस्त्यावर डान्स तर कधी अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सोशस मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओनं पोलिसांची झोप उडाली. त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत हा व्हिडिओ तयार करणाऱ्या तरुणांना जन्माची अद्दल घडवलीय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातल्या नोएडामधला हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ घटनास्थळावरील एका तरुणानं मोबाईलमध्ये शूट केला होता. नोएडामधल्या गजबजलेल्या बाजारपेठेतून एका तरुणाचं अपहरण करण्यात आलं असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलं होतं. 

हा व्हिडिओ पाहाताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.  या प्रकारचं कोणतंही अपहरण झालंच नसल्याची धक्कादायक गोष्ट पोलिसांच्या तपासात उघड झाली. वास्तविक नोएडामधील सेक्टर 18 मध्ये हे तीन तरुण इन्स्टाग्रामवर अपहरणाच्या थीमची रिल बनवत होते. या व्हिडिओसाठी ते त्यांच्याच मित्राला पकडून ओढत होते. 

( नक्की वाचा :  शाळकरी मुलांनी रिल्ससाठी चोरल्या महागड्या कार, एका चुकीमुळं फुटलं बिंग )

एसीडीपी मनीष कुमार मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार अजित, दीपक आणि अभिषेक असं या रिल्स बनवणाऱ्या तरुणांचं नाव आहे. त्यांचे सोशल मीडियावर शेकडो सबस्क्रायबर आहेत. त्यांनी भजनासह अनेक थिम्सवर आत्तापर्यंत रिल्स बनवले आहेत. पोलिसांनी या तरुणांना चांगलंच सुनावलं. त्यानंतर सार्वजनिक स्थळी शांतता बिघडवण्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल केला आणि सर्वांना अटक केली. काही वेळानंतर त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. 

Advertisement
Topics mentioned in this article