Teacher Suicide Note Milk Dues: आयुष्याचा शेवट करतानाही एका आईने तिच्या प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. तो समजल्यावर कुणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. मृत्यूच्या उंबरठ्यावर उभी असतानाही तिला कोणाचे देणे बाकी राहू नये याची काळजी होती. आपल्या चिमुकल्या मुलीचा विचार आणि पतीबद्दलचा संताप अशा टोकाच्या भावना मनात ठेवून एका शिक्षिकेने आपले जीवन संपवले आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यात समोर आली आहे.
काय आहे प्रकरण?
येथील सेहन गावामध्ये एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या 30 वर्षीय प्रिया भारती या शिक्षिकेने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रियाने मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यामध्ये तिने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे.
मात्र, या चिठ्ठीतील मजकूर वाचून पोलीसही चक्रावून गेले आहेत. तिने आपल्या चिठ्ठीत स्पष्टपणे लिहिले आहे की, मला रसुळपूर या माझ्या मूळ गावी नेऊ नका, माझे अंत्यसंस्कार याच ठिकाणी करा. विशेष म्हणजे, माझ्या पार्थिवाला अग्नी माझ्या पतीच्या हाताने न देता, माझ्या 3 महिन्यांच्या मुलीच्या हाताने द्यावा, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून कुटुंब रडलं, तोच निघाला सैतान; HR मॅनेजरच्या हत्येचं धक्कादायक सत्य )
काय होता शेवटचा मजकूर?
प्रियाने आपल्या सुसाईड नोटमध्ये इमानदारीचे एक अनोखे उदाहरण दिले आहे. तिने लिहिले की, माझे 5.5 लिटर दुधाचे पैसे देणे बाकी आहे, ते माझ्या पर्समध्ये ठेवलेल्या पैशातून देऊन टाकावे. आजारी असल्यामुळे मी हे पाऊल उचलत आहे, असे तिने चिठ्ठीत लिहिले असले तरी, तिच्या पतीबद्दलचा राग सुसाईड नोटमधून स्पष्टपणे दिसून येत आहे.
तिने आपला मोबाईल पतीकडे देण्यास सांगितले असून त्यात काही महत्त्वाचे मेसेज, ऑडिओ आणि व्हिडिओ असल्याचेही नमूद केले आहे. आई-बाबा, तुमची मुलगी हारली आहे, मला माफ करा, अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
( नक्की वाचा : Shocking News: रात्री पोटात गॅस झाला आणि सकाळी थेट मृत्यूची बातमी, काय आहे हे धक्कादायक प्रकरण? )
माहेरच्या मंडळींचा गंभीर आरोप
दुसरीकडे, प्रियाच्या माहेरच्या लोकांनी मात्र वेगळाच आरोप केला आहे. प्रियाचा पती दीपक राज आणि सासरच्या मंडळींकडून तिचा छळ होत होता, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तिने या त्रासाबद्दल आपल्या आईला आधीच कल्पना दिली होती, असा दावाही त्यांनी केला आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि मंगळवारी त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. सब डिव्हिजनल पोलीस अधिकारी संजीव कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे, परंतु अद्याप मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |