Vaishnavi Hagawane: 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं

Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेच्या आत्महत्या प्रकरणात आज (बुधवार, 28 मे) पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेच्या आत्महत्या प्रकरणात आज (बुधवार, 28 मे) पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणातील आरोपी शशांक, सुशील, राजेंद्र ,लता आणि करिष्मा हगवणे यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी हगवणे कुटुंबीयांचे वकील विपुल दोषी यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेत अनेक गंभीर आरोप केले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आरोपींचे वकील काय म्हणाले?

पुणे सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी वकील नितीन अडागळे आणि आरोपींचे वकील विपुल दुशिंग यांनी युक्तीवाद केले. यावेळी सरकारी वकिलांनी आरोपींचे मोबाईल अद्याप सापडले नाहीत. फरार आरोपी निलेश चव्हाण कुठे आहे, याची चौकशी करायची आहे असा युक्तीवाद करत आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. आरोपींनी हुंड्यात मिळालेले 51 तोळे सोने गहाण ठेवले आहे, त्याचीही माहिती घ्यायची आहे. तसंच अद्याप न सापडलेल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग असू शकतं, असा युक्तीवादही सरकारी वकील अडागळे यांनी केला. 

आरोपीचे वकील दुशिंग यांनी पोलीस कोठडीची गरज नाही, हा युक्तीवाद केला. गहाण ठेवलेले सोने कुठल्या ब्यांकेत आहे हे हगवणेंनी आधीच सांगीतले आहे.

Advertisement

( नक्की वाचा :  Vaishnavi Hagawane: वैष्णवीची आत्महत्या की खून? 'ही' गोष्ट निर्णायक ठरणार! डॉक्टरांनी सांगितली मोठी माहिती )

वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय

आरोपीचे वकील विपुल दुशिंग यांनी यावेळी मृत वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावरच संशय व्यक्त केला. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते‌. ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे, असा दावा त्यांनी केला. 

वैष्णवीनं यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे एका व्यक्तीसोबत चॅट पकडले होते. त्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केला. एकदा उंदराचे औषध घेऊन आणि एकदा गाडीतून उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न तिने केला होता, असा दावा हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाने केला. 

Advertisement

एखाद्या नवऱ्याने त्याच्या बायकोच्या कानाखाली मारले हा अत्याचार ठरत नाही, असा युक्तीवादही आरोपीचे वकील दुशिंगे यांनी केला. ही मीडिया ट्रायल सुरु आहे. आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु असा युक्कीवाद देखील त्यांनी केला. 

( नक्की वाचा : गौतमी पाटीलला बैलासमोर नाचवलं! वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक प्रताप उघड, पाहा Video )
 

पोलीस कोठडीत वाढ

दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर पुणे सत्र न्यायालयानं  हगवणे कुटुंबीयांच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. राजेंद्र आणि सुशील हगवणेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर शशांक, लता आणि करिश्मा हगवणेच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 
 

Advertisement