
राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि हुंडाबळी प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून वैष्णवीच्या आयुष्याचा शेवट झाला. ही आत्महत्या नसून खून आहे असा संशय त्यानंतर व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी रिमांड कॉपीमध्येही हा संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी वैष्णवीच्या पतीसह सासरे, सासू, दीर आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. 40 हजारांपेक्षा जास्त पोस्टमार्टमचा अनुभव असलेल्या डॉक्टरांनी 'NDTV मराठी' शी बोलताना याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डॉ. राजेश सी. डेरे यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना या संपूर्ण प्रकरणावर त्यांचं निरीक्षण सांगितलं आहे. ते सध्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज (TNMC) आणि बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर चॅरिटेबल हॉस्पिटल (BYL नायर हॉस्पिटल), मुंबई येथे फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकोलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तब्बल 40 हजार पोस्टमार्टम केले आहेत.
( नक्की वाचा : गौतमी पाटीलला बैलासमोर नाचवलं! वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक प्रताप उघड, पाहा Video )
डॉ. डेरे यांनी वैष्णवीचा खून झाला असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. गळा आवळला की आत्महlत्या हे काय जप्त केले आहे त्यावर ठरेल. वैष्णवीचे प्रेत उतरवले गेले तेंव्हाची परिस्थिती महत्वाची आहे.ज्या डॅाक्टरांनी पोस्ट मार्टम केले त्यांनी जागेवर जावून पाहणी केली तर याचे उत्तर मिळू शकेल. सगळे रासायनिक विश्लेषण झाल्यावर डॅाक्टरांना मत देता येईलहा खून असू शकतो पण हे पुर्ण तपास झाल्यावर सांगता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. डॉ. राजेश सी. डेरे हे फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकोलॉजी या क्षेत्रातील एक दिग्गज वैद्यकीय तज्ज्ञ आहेत, त्यामुळे त्यांचं हे मत महत्त्वाचं आहे.
पोस्टमार्टम अहवालात काय?
दरम्यान, आत्महत्या केल्याच्या दिवशी वैष्णवीला सासरकडील लोकांकडून मारहाण झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून मिळाली आहे. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर 29 जखमा आढळल्या आहेत. त्यापैकी 15 जखमा आत्महत्या करण्यापूर्वी चोवीस तासांच्या आतील आहेत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.
वैष्णवीच्या अंगावर एकूण 30 जखमा आढळल्या आहेत. त्यापैकी 29 जखमा या शवविच्छेदनापूर्वीच्या आहेत. 15 जखमा या मृत्यूपूर्वी चोवीस तासांच्या आतील आहेत. एक जखम मृत्यूच्या चार ते सहा दिवस आधी झाली आहे. 11 जखमा या मृत्यूपूर्वी 5 ते 6 दिवसांपूर्वीच्या आहेत. दोन जखमा या तीन ते सहा दिवसांपूर्वीच्या आहेत, असे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world