Pune Crime : वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र आणि सुशील हगवणेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

वैष्णवीचा छळ करणाऱ्या तिच्या सासरच्या मंडळींना कडक शिक्षा दिली जावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेला वैष्णवीचा सासरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुळशीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. याशिवाय वैष्णवीचा दीर सुशील हगवणे यालाही 14 दिवस न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दोघांचीही येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील तिसरा आरोपी निलेश चव्हाण याला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात तिघांनाही हजर करण्यात आले होते. यावेळी ही सुनावणी झाली. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! हगवणे माय-लेकाचा पोलीस घेणार ताबा

वैष्णवीची आत्महत्या की हत्या?
वैष्णवीच्या मृत्यूनंतर केलेल्या पंचनाम्यात तिचे वजन 71 किलो नोंदविले आहे. त्यामुळे ही साडी आणि पंखा खरंच एवढं वजन पेलू शकणारं होतं का याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वैष्णवीची साडी आणि तो पंखा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. शिवाय या प्रकरणात सहआरोपी निलेश चव्हाणचा लॅपटॉप आणि मोबाइल ही तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये ही अनेक पुरावे व्हिडिओ क्लिप असू शकतात असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान निलेश चव्हाणची मैत्रीण आणि एका महिलेची ही पोलिसांनी चौकशी केली असून यातून ही अनेक धक्कादायक खुलासे समोर येणार असल्याचं बोलले जात आहे.

Advertisement