Pune Crime : वैष्णवीचा मृत्यू नेमका कसा झाला? साडी आणि फॅनच्या मदतीने फॉरेन्सिक विभाग रहस्य उलगडणार

Vaishnavi Hagavane death case : वैष्णवीच्या मृत्यूनंतर केलेल्या पंचनाम्यात तिचे वजन 71 किलो नोंदविले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, प्रतिनिधी

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात तपासाला आता गती आली असून या प्रकरणात वैष्णवीने ज्या साडीने पंख्याला गळफास घेतला होता तो पंखा आणि साडी आज फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वैष्णवीच्या आत्महत्येच्या वृत्ताने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणामुळे महिलांवरील विवाहानंतर होणारा छळ, हुंड्यामुळे केला जाणारा त्रास या सर्व गोष्टी पुन्हा एकदा चर्चेला आल्या आहेत. वैष्णवीचा सासरी अनन्वित छळ करण्यात आला होता. दरम्यान वैष्णवीने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला यासंदर्भातही चर्चा केली जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून यादृष्टीनेही तपास सुरू आहे.  

नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar : प्रेमाची शिक्षा केवळ दु:ख अन् छळ; माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला दोरीने बांधून शरीरावर चटके

वैष्णवीच्या मृत्यूनंतर केलेल्या पंचनाम्यात तिचे वजन 71 किलो नोंदविले आहे. त्यामुळे ही साडी आणि पंखा खरंच एवढं वजन पेलू शकणारं होतं का याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वैष्णवीची साडी आणि तो पंखा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. शिवाय या प्रकरणात सहआरोपी निलेश चव्हाणचा लॅपटॉप आणि मोबाइल ही तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये ही अनेक पुरावे व्हिडिओ क्लिप असू शकतात असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान निलेश चव्हाणची मैत्रीण आणि एका महिलेची ही पोलिसांनी चौकशी केली असून यातून ही अनेक धक्कादायक खुलासे समोर येणार असल्याचं बोलले जात आहे.

Advertisement