जाहिरात

नेपाळला पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या निलेश चव्हाणचा खेळ खल्लास, पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Vaishnavi Hagwane Case :: पुण्यातील विवाहित महिला वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आली आहे.

नेपाळला पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या निलेश चव्हाणचा खेळ खल्लास, पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई:

Vaishnavi Hagavane Case : पुण्यातील विवाहित महिला वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आली आहे. निलेश चव्हाणकडेच वैष्णवीचे बाळ होते. त्याला पुण्यातील बावधन पोलिसांनी भारत-नेपाळ सीमेवर अटक केली आहे. तो 21 मे पासून फरार होता. निलेशवर कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप होता. निलेशच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक बळ मिळणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोण आहे निलेश चव्हाण?

निलेश चव्हाणचा बिल्डर असून त्याचा पोकलेन मशीनचा देखील व्यवसाय आहे. निलेश  हा शशांक हगवणेची बहिण करिश्मा हगवणेचा मित्र असल्याची माहिती आहे. शशांक आणि वैष्णवी यांच्या वादात देखील तो अनेकदा असायचा. यांच्यातील कौटुंबिक वादामधे तो अनेकदा सहभागी असायचा, अशी माहिती आहे. 

Latest and Breaking News on NDTV

वैष्णवी प्रकरणाशी संबंध काय?

20 मे रोजी वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तिच्या 9 महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वेनगर येथील निलेश चव्हाणच्या घरी गेले होते. यावेळी त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून कस्पटे कुटुंबीयांना धमकावले. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 351(3) आणि शस्त्र कायदा कलम 30 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

( नक्की वाचा : Vaishnavi Hagawane: 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं )
 

गुन्हेगारी इतिहास

निलेश चव्हाण याचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही उघड झाला आहे.  2019 साली त्याच्यावर पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेऱ्याद्वारे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, पोलिसांनी आता त्याच्या पुण्यातील कर्वेनगर परिसरातील घरावर छापा मारून तेथील काही तपासाच्या दृष्टिकोनातून ताब्यात घेण्याची शक्यता आहे. निलेश याचा लॅपटॉप देखील यापूर्वी ताब्यात घेण्यात आला आहे.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com