जाहिरात

Pune News: 2 किलो चांदी, कार देऊनही सासरच्यांची भूक भागेना; पुण्यातील बड्या कुटुंबाकडून सूनेचा हुंड्यासाठी छळ

Pune News: पुण्यातील लोहगावमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा अमानवीय छळ केल्याप्रकरणी बड्या कुटुंबातील दोन व्यक्तीविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे, वाचा सविस्तर बातमी.

Pune News: 2 किलो चांदी, कार देऊनही सासरच्यांची भूक भागेना; पुण्यातील बड्या कुटुंबाकडून सूनेचा हुंड्यासाठी छळ
"Pune News: सूनेचा छळ करणाऱ्या बड्या कुटुंबातील दोन जणांविरोधात गुन्हा"
Canva

- अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी

Pune News: पुण्यातील लोहगाव परिसरात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना समोर आलीय. या प्रकरणी मुळशीतील एका बड्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या या घटनेत मुळशीतील संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे आणि पत्नी सुवर्णा लोखंडेविरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हुंड्यासाठी केला सूनेचा छळ 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित विवाहितेच्या लग्नात माहेरच्या मंडळींनी सुमारे 2 कोटी रुपये खर्च केले होते. यामध्ये दोन किलो चांदी आणि एक आलिशान चारचाकी गाडी देखील देण्यात आली होती. पण एवढे देऊनही सासरच्या मंडळींचे समाधान झाले नाही. लोखंडे कुटुंबाला शेअर मार्केटमध्ये सुमारे 2 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी सूनेकडे माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला.

(नक्की वाचा: Pune News : पुण्यातील 'या' भागातील घरांवर चोरट्यांची नजर, उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी टाळा तोडला अन्..)

पिस्तुलाचा धाक आणि अमानवीय छळ

पैशांच्या मागणीसाठी लोखंडे कुटुंबाने सूनेला अतिशय क्रूर वागणूक दिल्याचा आरोप आहे. शेअर मार्केटचे कर्ज फेडण्यासाठी तिच्या डोक्याला पिस्तुल लावल्याचा प्रकार केला होता, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर तिच्या अंगावर गरम पाणी ओतण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अमानवीय छळामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

(नक्की वाचा: Pune News: जवानाच्या अपघाती मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना अपयश; त्या 'दोन नोंदीं'नी वाढवला संताप)

लोखंडे दाम्पत्याला न्यायालयाचा दणका

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अनिल लोखंडे आणि सुवर्णा लोखंडेने अटकेपासून बचाव करण्यासाठी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. पण न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंबात घडलेल्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोहगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com