मनोज सातवी, प्रतिनिधी
Vasai Crime News : कांदिवली येथील एका 43 वर्षांच्या महिलेला वसईत राहणाऱ्या एका दांपत्याने घरात डांबून ठेवून अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या मारहाणीत पीडितेचे कात्रीने केस कापण्यात आले तसेच, तिच्या चेहऱ्यावर ब्लेडने कापण्यात आले. एवढेच नव्हे तर तिच्या हातावर आणि गुप्तांगावर देखील इस्त्रीचे चटके देण्यात आल्यास चा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या मारहाणीचा हा सर्व प्रकार आरोपी महिलेच्या पतीने मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित करून तो व्हिडिओ नातेवाईकांना पाठवला आहे.
काय आहे प्रकरण?
पीडित महिला ही आरोपी दांपत्याची नातेवाईक लागत असून या दाम्पत्याने तिच्याकडून घर बांधण्यासाठी 13 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते मात्र ते फेडले गेले नव्हते.. उलट कर्ज देणाऱ्या महिलेवर हे दांपत्य दादागिरी करत होते, कर्जाची रक्कम देयायचे सांगून त्यांनी या महिलेला घरी बोलावून घेतले आणि तिला पुन्हा पैशाचा विषय काढू नये यासाठी अमानुष मारहाण केली. त्यांनी या मारहाणीचे चित्रीकरण केले.
( नक्की वाचा : ओढणीनं आवळला गळा, मृतदेह घेऊन बाईकवर फिरले, प्रियकरासोबत पकडलं म्हणून YouTuber नं घेतला नवऱ्याचा जीव )
या प्रकरणात वालीव पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे... आरोपी घराला कुलूप लावून फरार झाले असल्याची माहिती समोर येत आहे.