
सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर रवीनाआणि सुरेश हे दोघं दीड वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. त्यांनी एकत्र व्हिडिओ करण्यास सुरुवात केली. रविनाचा सोशल मीडिया वापरावर नवरा प्रवीणशी नेहमी वाद होत असे. रवीनाआणि सुरेश यांच्यात प्रेमसंबंध आहेत, असा संशय प्रवीणला होता.
25 मार्च रोजी प्रवीण घरी आला आणि घरातील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. त्याची भीती खरी ठरली होती. त्यानं रवीनाआणि सुरेशला आक्षेपार्ह स्थितीमध्ये पाहिलं. ते पाहून प्रवीणचा संयम संपला. त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या भांडणात संतापलेल्या रविनानं ओढणीनं गळा दाबून प्रवीणची हत्या घेतली. रवीना आणि सुरेश यांनी रात्र होईपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर त्या दोघांनी बाईकवरुन त्याचा मृतदेह सहा किलोमीट दूर अंतरावरील नाल्यात फेकून दिला. तीन दिवसांनी प्रवीणचा फुगलेला मृतदेह नाल्याच्या ड्रेनेजमधूनवर आला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि कॅमेऱ्यातून या हत्येचा आणि रविना आणि सुरेश यांच्यातील अफेयरचा खुलासा झाला आहे.
रविना ही हरियाणातील सोशल मीडिया स्टार आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 34,000 तर यूट्यूब चॅनेलवर 5,000 फॉलोअर्स आहेत. तिचे बहुतेक व्हिडिओ हे विनोदी आणि कौटुंबिक विषयांवर आहेत. विरोधाभास म्हणजे याच व्हिडिओमुळे ती कुटुंबापासून दूर गेली. रविना आणि प्रवीणचं लग्न झालं होतं. त्या दोघांना सहा वर्षांचा मुलगा आहे. ती व्हिडिओ करण्यासाठी अनेकदा प्रवास करत असे. प्रवीण आणि घरातील अन्य मंडळींचा त्यावर आक्षेप होता. त्यामुळे त्यांची भांडणं होत असतं. पण, रवीनानं तरीही ऐकलं नाही.
( नक्की वाचा : दोन मुलांची आई पडली शेजारच्या तरुणीच्या प्रेमात, दोघी घरातून पळाल्या, शोधल्यानंतर पोलिसांना बसला धक्का )
धक्कादायक खुलासा
सुरेशनं पोलिसांना सांगितलं की, रवीना शूट करण्यासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर ती 25 मार्च रोजी प्रवीणच्या भिवानीमधील घरी परतली. सुरेश तिथं तिला भेटायला गेले. ते दोघं आक्षेपार्ह स्थितीमध्ये पाहिलं. त्यानंतर झालेल्या वादातून प्रवीणची हत्या झाली.
रवीना या हत्येनंतरही काही झालंच नाही या थाटात वागत होती. प्रवीण कुठं गेलाय हे माहिती नाही असं तिनं नातेवाईकांना सांगितलं. सुरेश बाईक घेऊन आल्यानंतर त्या दोघांनी मिळून प्रवीणच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.
( नक्की वाचा : Love Story : केस कापले, मेसेजची वाट पाहिली, भावाशी गुप्त लग्न करणाऱ्या बहिणीनं भयंकर केलं! )
कसं झालं सत्य उघड?
26 मार्चला मध्यरात्री 12.30 च्या सुमारास रवीना आणि सुरेश यांनी प्रवीणचा मृतदेह बाईकवर ठेवला आणि ते दोघं घरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्याच्या ठिकाणी पोहचले. त्यांनी तिथं तो मृतदेह फेकला आणि घरी परतले.
तीन दिवसांनंतर पोलिसांना प्रवीणचा मृतदेह सापडला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. त्यावेळी बाईकनं तीन जण आले आणि परत दोन व्यक्ती आल्याचं त्यांना आढळलं. एक व्यक्ती बेपत्ता असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी रवीना आणि सुरेश यांना ताब्यात घेतले. या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world