Vikhroli News: विक्रोळी हादरली! भल्यामोठ्या स्पीकरने 3 वर्षांच्या चिमुकलीचा घेतला जीव, चुकीला जबाबदार कोण?

Vikhroli News: मुंबईतील विक्रोळी परिसरात अतिशय भयावह घटना घडलीय. दोन सेकंदाच होत्याचं नव्हतं झालंय.

जाहिरात
Read Time: 1 min
"Vikhroli News: स्पीकर ठरला जीवघेणा"
NDTV Marathi

Vikhroli News: प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरू असताना मुंबईतील विक्रोळी परिसरामध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. विक्रोळी येथील टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरामध्ये एका तीन वर्षीय चिमुकलीचा स्पीकरमुळे मृत्यू झाला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2026) परिसरात मोठमोठे दोन स्पीकर लावण्यात आले होते. हे स्पीकर तीन वर्षीय मुलीच्या अंगावर पडले आणि घटनेत तिचा मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.  

नेमके काय घडलं? 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मुलगी धावत असल्याचे दिसतंय आणि तिच्या पुढे मोठे ओझे डोक्यावरून वाहून घेऊन जाणारा व्यक्तीही दिसतोय. तो पुढे गेल्यानंतर एकापाठोपाठ एक असे दोन्ही स्पीकर लहान मुलीच्या अंगावर पडल्याचं दिसतंय. चिंध्या गोळा करणाऱ्या व्यक्तीच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचे म्हटलं जातंय. 

(Dhurandhar Actor arrested: धुरंधरचा अभिनेता अटकेत, लग्नाचं आमिष दाखवून मोलकरणीवर सलग 10 वर्ष बलात्कार)

चुकीला जबाबदार कोण?

पाहा सीसीटीव्ही फुटेज : VIDEO