जाहिरात

Viral News: सुंदर तरुणीने तोकडे कपडे घातल्याचे पाहून ऑटो ड्रायव्हर भडकला, भर रस्त्यात बॉयफ्रेंड समोरच..

या पोस्टमध्ये लिहिले आहे की, रस्त्यावर ऑटोचालक तिच्यावर आणि तिच्या बॉयफ्रेंडवर ओरडला.

Viral News: सुंदर तरुणीने तोकडे कपडे घातल्याचे पाहून ऑटो ड्रायव्हर भडकला, भर रस्त्यात बॉयफ्रेंड समोरच..

तोकडे कपडे घातले म्हणून थेट बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली. ही धमकी तिच्या बॉयफ्रेंडसमोरच देण्यात आली.  बेंगळुरूच्या इंदिरानगर परिसरात ही घटना घडली. एका ऑटोचालकाने एका तरुणीला तिच्या पेहरावावरून बलात्काराची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. एका 'Reddit' युजर्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत माहिती देत, हा अनुभव कथन केला आहे. ही घटना शनिवार, दुपारी सुमारे 3 वाजता घडली आहे. ऑटोचालकाला तरुणीने घातलेली शॉर्ट स्कर्ट आवडला नाही, म्हणून त्याने ही धमकी दिली, असे पोस्टमध्ये नमूद आहे.

बॉयफ्रेंडसमोर दिली धमकी आणि शिवीगाळ
या पोस्टमध्ये लिहिले आहे की, रस्त्यावर ऑटोचालक तिच्यावर आणि तिच्या बॉयफ्रेंडवर ओरडला. नंतर तो त्यांच्याजवळ आला आणि स्कर्ट 'खूप छोटी' असल्याचे सांगून तिला शिवीगाळ करू लागला. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, चालकाने तिच्या बॉयफ्रेंडला धमकावले की, "जर तीने असे कपडे घालेल, तर लोक तिचा बलात्कार करतील; मी तिचा बलात्कार करेन. तो असा बोलल्यानंतर ती तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंड हादरून गेले. 

Latest and Breaking News on NDTV

सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
तरुणीच्या बॉयफ्रेंडने चालकाशी वाद घातला, त्यानंतर तो गाडी घेऊन निघून गेला. 'Reddit' युजर्सने सांगितले की, ती ऑटोचा रजिस्ट्रेशन नंबर (Registration Number) किंवा घटनेचा व्हिडिओ (Video) बनवू शकली नाही. परंतु, चालकाचे वर्णन करताना तिने सांगितले की, तो म्हातारा होता आणि त्याचे केस पांढरे होते. "माझा बॉयफ्रेंड माझ्यासोबत असल्याने मला जास्त भीती वाटली नाही. पण एकटी प्रवास करणाऱ्या इतर महिलांसोबत तो काय करू शकतो याची मला चिंता वाटते," असे तिने लिहिले. या घटनेमुळे बेंगळुरूसारख्या शहरात महिलांच्या सार्वजनिक सुरक्षिततेवर (Public Safety) गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com