Mobile Phone Snatcher Death: बंगळुरूमध्ये मोबाइल चोरीचे एक अतिशय संवेदनशील प्रकरण समोर आले आहे. रस्त्यावर चालणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाइल हिसकावून पळणाऱ्या चोराला त्याच्या कर्माची शिक्षा त्याला अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मिळाल्याचे नेटकरी म्हणत आहेत. हृदयविकाराचा रुग्ण असलेल्या या चोराने त्याच्या एका साथीदारासह मोबाइल चोरीची घटना घडवून आणली होती, पण स्कुटीवरून पळून जाताना तो अचानक अपघाताचा बळी ठरला आणि त्याचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा: Optical Illusion Creature: 99% लोकांनी ओळखला नाही हा जीव, फोटो पाहून उडाली घाबरगुंडी, पण सत्य जाणून थक्क व्हाल)
खांद्यावरील पोते मजुराने जुनैदच्या स्कुटीवर फेकले
बंगळुरूतील वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या कब्बनपेट भागात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये बाइकवर असलेले दोन तरुण एका व्यक्तीचा पाठलाग करतात आणि वेगाने त्याचा मोबाइल फोन हिसकावून पळू लागतात. पीडित व्यक्तीचा आरडाओरडा ऐकून लोकांनी बाइकचा पाठलाग केला. 'चोर चोर' ओरडत पळणाऱ्या चोरांना पाहून तिथून जाणाऱ्या एका मजुराने आपल्या खांद्यावरील पोते जुनैदच्या स्कुटीवर फेकले, ज्यामुळे दोघेही फुटपाथवर पडले.

फुटपाथवर धावताना जुनैद अचानक खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुराच्या पोत्याला धडकून स्कुटीवरून खाली पडलेले दोन्ही तरुण फुटपाथवरून पळू लागले. पण सुमारे 250 मीटर अंतरावर मृतक जुनैद अचानक पुन्हा फुटपाथवर कोसळला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांचे म्हणणे आहे कि, मृत व्यक्तीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती, पण त्याचा साथीदार अरबाज हा सराईत गुन्हेगार असून त्याचा आधीही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. अरबाजला नंतर शोधून अटक करण्यात आली.
जुनैदच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, तो हृदयविकाराचा रुग्ण होता आणि त्याच्या हृदयाला कोरोनरी स्टेंट (धातूच्या तारेची जाळीदार ट्यूब, जी हृदयाच्या ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या ठेवण्यासाठी बसवली जाते) लावण्यात आले होते. यामुळेच धावताना खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा. पोलिसांनी जुनैदच्या मृत्यूची नोंद अकस्मात मृत्यू (Unnatural Death) म्हणून केली आहे.
जुनैदच्या मृत्यूला कर्माचे फळ म्हणत आहेत सोशल मीडिया युजर्स
घटनेनंतर सोशल मीडियावर या गुन्ह्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्स जुनैदच्या मृत्यूला कर्माचे (Karma) फळ मानत आहेत. एका युझरने लिहिले, जर चुकीचे काम करणाऱ्यांसोबत बहुतांश प्रकरणांमध्ये असेच घडू लागले, तर लोकांचा कर्मावरील विश्वास अधिक दृढ होईल. दुसऱ्या एका युझरने कमेंटमध्ये लिहिले, तो केवळ त्याच्या हृदयाच्या आजारामुळे चोर बनला, चला यावर एक सिनेमा बनवूया.
(Disclaimer: एनटीव्ही मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world