छत्रपती संभाजीनगरच्या वाळुजमधील महावीर चौकात दोन मद्यधुंद तरुणींनी भररस्त्यात धिंगाणा घालत. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्या थेट शिवीगाळ करत होत्या. लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. पण तरीही त्या आपल्या तोंडाची हवा करत होत्या. त्यात संबंधित तरुणी आपला भाऊ डॉन असल्याचा दावा करत होती. शिवाय “तो मर्डर सुद्धा करतो,” अशी धमकी ही रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांना देत होती. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्हायरल झालेल्या व्हिडीओत दोन तरूणी दिसत आहेत. हा व्हिडीओ छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज या भागातला असल्याचं सांगितलं जात आहे. या तरुणींनी आम्हाला पोलीसही काही करू शकत नाहीत. आम्ही मोठ्या घरातील आहोत, असं सांगत होत्या. तसं व्हिडीओमध्ये ही रेकॉर्ड झालं आहे. बरं त्या ऐवढ्यावर थांबलेल्या नाहीत. त्यांनी आपण दारू का प्यायली आहे याचं कारण ही त्या येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत आहेत.
आपण केवळ टेन्शनमुळे दारू प्यायली आहे, असे त्यांनी सांगितलं. मद्यधुंद अवस्थेत त्या दोघी ही सार्वजनिक शांतता भंग करत होत्या. नागरिकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी शिवीगाळ करत अरेरावीचा सूरच कायम ठेवल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
या व्हीडीओमध्ये दोन तरुणी दिसत आहेत. त्यांनी इतकी दारू घेतली आहे की त्यांना निट चालता ही येत नाही. दोघी ही एकमेकींना पकडून चालताना त्या व्हिडीओत दिसत आहेत. मध्येच त्यांचा तोलही जाताना दिसत आहे. लोक त्यांना समजवून सांगत आहेत. पण त्या समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. उलट त्या अरेरावी करत असताना त्यात दिसत आहेत.