
राहुल कांबळे
नवी मुंबईतील दिघा परिसरात राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाविरुद्ध एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने एका तरुणीचा नग्न व्हिडीओ चोरीछुप्या पद्धतीने रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पीडित मुलीला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर ती प्रचंड तणावाखाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2023 ते 23 जून 2025 या कालावधीत आरोपी मोहम्मद कैफ याने फिर्यादीसोबत इंस्टाग्रामवर व्हिडीओ कॉल केला होता. या दरम्यान, फिर्यादी अंघोळ करत असताना तिच्या नकळत तिचा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला. पीडितेला याची कल्पना नव्हती. आरोपीने हा व्हिडीओचा नंतर गैर वापर केला. आपल्या बरोबर शरीरसंबध ठेव असा दबाव त्यांने त्या तरुणीवर टाकला. शिवाय तो व्हिडीओ दाखवत तिला ब्लॅकमेल केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तरुणीने त्या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात तीचा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडियावर व्हायरल केला. ही बाब त्या तरूणीला समजली. त्यानंतर तिला धक्का बसला. आपली यामुळे मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे हे तिला सहन झाले नाही. त्यानंतर तिने तातडीने नवी मुंबई रबाळे एमआयडीसी पोलिसांत धाव घेतली. त्या तरूणा विरोधात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे हे आरोपीला समजले. त्यानंतर तो फरार झाला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणामुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर प्रकारात इ-साक्ष प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. हा गुन्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा गंभीर गैरवापर दर्शवतो. सोशल मीडियावर व्हिडीओ कॉलिंग आणि खाजगी क्षण रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणे हा वाढता प्रकार ठरत आहे.
आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वी मैत्री होती की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. गुन्ह्याचे स्वरूप हे लैंगिक अत्याचार व सायबर गुन्हेगारी या दोन्हींच्या चौकटीत मोडते. नवी मुंबई पोलिसांन कडून नागरिकांना आवाहन याबाबत आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगावी. अनोळखी व्यक्तींशी व्हिडीओ कॉल टाळावेत. खाजगी क्षण कुणासमोरही शेअर करू नयेत. अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगचा बळी ठरल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी असे ही सांगण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world