हल्ली कोणाला कसला राग येईल याचा नेम नाही. शिवाय त्यानंतर या रागाच्या भरात ते काय करतील याचाही नेम नाही. अशा अनेक घटना आपल्या समोर येत असतात. अशीच एक घटना आता नांदेडमध्ये पाहायला मिळाली नाही. हॉर्न वाजवण्यावरून वाद होऊ शकतो. पण तो किती टोकाला जावू शकतो याची प्रचेतीच या घटनेवरुन नांदेडकरांना आली आहे. या घटनेनंतर सर्वच जण आवाक झाले आहेत. त्यातून लोकांना झालय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकांची सामाजिक सहनशक्ती संपत असल्याचं एक उदाहरण नांदेड शहरात बघायला मिळालं. प्रकाश नागरगोजे हे पेशाने डॉक्टर आहेत. त्यांचे लोहा तालुक्यातील लालकोळी या गावात रुग्णालय आहे. ते रुग्णालयात नेहमी प्रमाणे जाण्यासाठी निघाले होते. सकाळी साडे अकराची वेळी झाली होती. ते आपल्या कारने रुग्णालयात जात होते. त्यांची गाडी आरटीआय चौकात आली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या गाडीची हॉर्न वाजवला.
ट्रेंडिंग बातमी - BJP Annamalai: पाठीवर चाबकाचे फटके मारत घेतली मोठी शपथ, राजकारणातली नवी स्टाईल
त्याच वेळी त्यांच्या शेजारी एक तरूण होता. त्याने डॉक्टर नागरगोजे यांना तुम्ही हॉर्न का वाजवता अशी विचारणा केली. ट्राफीक असल्याने हॉर्न वाजवला जातो ही साधी गोष्ट होती. पण हॉर्न वाजवण्याचा या तरुणाला भलताच त्रास झाला. तो संतापला. त्याचा राग अनावर झाला. त्याने मागचा पुढचा विचार केला नाही. त्याने नागरगोजे यांच्या बरोबर भांडण करण्यास सुरूवात केली. तो काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता.
नागरगोजे यांनी गाडी सुरू केली. त्यावेळी हा तरुण चालत्या गाडीच्या टपावर चढला. त्यानंतर तो धावत्या गाडीतच टपावरून डॉक्टर नागरगोजे यांना मारहाण करू लागला. तो काही केल्या मारहाण करण्याचे थांबत नव्हता. गाडी धावत होती. तो टपावर लटकत मारहाण करतच होता. ही सर्व दृष्य नांदेडकर बघत होते. त्यातील एकाने याचा व्हिडीओही शुट केला. त्यानंतर त्याच स्थितीत डॉ. प्रकाश नागरगोजे यांनी आपली गाडी थेट पोलिस स्थानकात नेली. त्यानंतर पोलिसांनी संबधीत तरुणाला ताब्यात घेतलं.