जाहिरात

Dr.Manmohan Singh : मनमोहन सिंगांच्या एकाच फटक्यात मोहम्मद अली जिन्ना गरगरले; वाचा भन्नाट किस्सा

भारताचे माजी पंतप्रधान आणि जगविख्यात अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) रात्री निधन झाले. 2004 ते 2014 या काळात त्यांनी भारताचे दोनदा पंतप्रधानपद भूषविले होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Dr.Manmohan Singh : मनमोहन सिंगांच्या एकाच फटक्यात मोहम्मद अली जिन्ना गरगरले; वाचा भन्नाट किस्सा
नवी दिल्ली:

Dr. Manmohan Singh Passes Away : भारताचे माजी पंतप्रधान आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग (Former PM of India Dr. Manmohan Singh) यांचे गुरुवारी (26 डिसेंबर 2024) निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. सिंग यांच्या निधनानंतर त्यांना फक्त भारतातूनच नव्हे तर जगभरातील मान्यवरांकडून आदरांजली वाहण्यात येत आहे. मनमोहन सिंग यांचे भारतासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डॉ.मनमोहन सिंग यांच्याशी निगडीत एक गंमतीशीर किस्सा आहे, जो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मनमोहन सिंग यांनी एका फटक्यात भारत-पाकिस्तान फाळणीला जबाबदार असलेल्या मोहम्मद अली जिन्ना यांना दिवसा तारे दाखवले होते. 

त्यावेळेस फाळणी झालेली नव्हती आणि मनमोहन सिंग हे पंजाबमध्ये राहत होते. फाळणीनंतर ते राहत असलेला भाग पाकिस्तानात गेला. हा किस्सा डॉ.मनमोहन सिंग 13 वर्षांचे असतानाचा आहे. त्याकाळी मनमोहन सिंग हॉकी खेळत होते. बंगळुरू येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्वत: मनमोहन सिंग यांनी हा किस्सा सांगितला होता.

(नक्की वाचा : अर्थव्यवस्थेचा कोहिनूर कालवश! डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर)

डॉ.मनमोहन सिंग यांनी सांगितले की, 1945 चे वर्ष होते आणि आम्ही हॉकी खेळत होतो. मी तेव्हा 13 वर्षांचा होतो आणि लाहोरच्या एका कॉलेजच्या मैदानावर हॉकी खेळत होतो. मनमोहन सिंग यांनी पुढे सांगितले की, मला गोल करण्याची संधी मिळाली आणि मी पूर्ण ताकदीने गोल पोस्टच्या दिशेने बॉल मारला. मात्र माझा फटका चुकला ज्यामुळे बॉल गोल पोस्टमध्ये जाण्याऐवजी मैदानाला लागून असलेल्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या माणसाला जाऊन लागला. ती व्यक्ती होती मोहम्मद अली जिन्ना. सण्ण....करून कपाळावर बसलेल्या बॉलमुळे जिन्ना गरगरले होते. त्यांना क्षणभर कळलेच नाही की काय झाले. 

देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. सोबतच शुक्रवारी (27 डिसेंबर) होणारे सगळे सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

(नक्की वाचा : या' निर्णंयासाठी डॉ. मनमोहन सिंग सदैव राहतील लक्षात...)

शुक्रवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती, यामध्ये देखील मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com