- तेलंगणा पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या दाम्पत्याला अटक केली आहे
- आरोपी महिला इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो टाकून पुरुषांची मैत्री वाढवत त्यांना भेटीस बोलवत होती
- आरोपी दाम्पत्याने पुरुषांचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग करून मोठी आर्थिक कमाई केली आहे
पैसे कमवण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. मग त्यासाठी काही करण्याची तयारी या लोकांची असते. मग त्यांना कसलेच भान राहात नाही. अशीच एक धक्कादायक घटना आणि सर्वांनाच चक्रावून टाकणारी घटना समोर आली. आहे. सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या आणि त्यानंतर त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या एका दाम्पत्याला तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. आरेपल्ली परिसरातील या दाम्पत्याने आतापर्यंत तब्बल 1500 पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. या मागचा त्यांना प्लॅन ही भयंकर होता. त्यामुळे तर सगळेच आवाक झाले आहेत.
आरोपी महिला इंस्टाग्रामवर ‘Lallydimplequeen' या नावाने सक्रिय होती. त्यावर ती ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ टाकायची त्यातून ती पुरुषांशी मैत्री वाढवत असे. मैत्रीचे रूपांतर भेटीत झाल्यानंतर, ती त्यांना आपल्या घरी बोलवत असे. तिथे ती त्यांच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत असत. त्याच वेळी तिचा पती लपून या क्षणांचे व्हिडिओ शूट करत असे. हेच व्हिडिओ नंतर ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जात होते. आपला व्हिडीओ काढला जात आहे याची पुसटती कल्पना ही त्या पुरूषांना येत नव्हती. त्यामुळे त्या सुंदर तरूणीच्या जाळ्यात हे पुरूष अलगद अडकत होते.
ऐशो आरामासाठी या दाम्पत्याने हा प्रकार केल्याचं ही समोर आले आहे. मालमत्तेचा डोंगर कर्जातून मुक्त होण्यासाठी सुरू केलेल्या या व्यवसायातून दाम्पत्याने मोठी माया जमवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ब्लॅकमेलिंगच्या पैशांतून 65 लाख रुपयांचा प्लॉट खरेदी केला होता. शिवाय 10 लाख रुपयांची कार आणि महागडे फर्निचर खरेदी केले होते. एका लॉरी व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या व्यावसायिकाकडून त्यांनी आधीच 13 लाख रुपये उकळले होते. त्यांनी त्याच्याकडून पुन्हा 5 लाख रुपयांची मागणी केली होती. शेवटी या व्यावसायिकाने पैसे देण्या ऐवजी पोलीसामध्ये धाव घेतली.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन यावेळी पोलीसांनी केले आहे. या दाम्पत्याने अवघ्या काही महिन्यांत 65 लाखांचा प्लॉट आणि आलिशान कार खरेदी केली होती. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येताना काळजी घ्यावी. जर कोणी अशा प्रकारे ब्लॅकमेल करत असेल, तर न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा. अनेक जण बदनामी आणि घाबरून अशा प्रकारच्या प्रकारात अडकून जातात.या तरूणीच्या चौकशीत अशी बाब समोर आली आहे की तिने या सर्व कांडात जवळपास 100 तरूणां सोबत शरिरसंबध प्रस्तापित केले होते.नंतर त्यांच्याकडून पैसे ही उकळले होते. त्यात तिला तिच्या पतीची ही साथ लाभत होती.