Walmik Karad Surrender :वाल्मिक कराडचा नवा Video, पुणे CIDला शरण जाण्यापूर्वी काय म्हणाला?

शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिक कराड याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांसह भाजप आमदारांकडून वाल्मिक कराड याच्यावर अनेक आरोप केले जात आहे. त्याशिवाय मस्साजोगमधील खंडणी प्रकरणात वाल्किम कराड याच्याविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते. दरम्यान अत्यंत महत्त्वाची राजकीय अपडेट समोर आली आहे. वाल्किम कराड आज पुणे सीआयडीसमोर शरण आले आहे. मात्र शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिक कराड याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वाल्मिक करा यांच्याविरोधात खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासाठी सीआयडीकडून त्यांचा शोध घेतला जात होता. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ते फरार होते. अखेर आज तो पोलिसांना शरण आला आहे. यापूर्वी त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपींना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशीही मागणी केली आहे.

नक्की वाचा - Walmik Karad Update : आताची मोठी बातमी, वाल्मिक कराड पोलिसांना शरण

वाल्मिक कराडचं म्हणणं काय?
माझ्याविरोधात बीडमधील केज पोलीस ठाण्यात खंडणीच्या खोट्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी अटकपूर्व जामीनाचा अधिकार असताना मी पुणे सीआयडीसमोर शरण जात आहे. जरी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपींना अटक करावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि यात जर मी दोषी ठरतो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ते भोगण्यास मी तयार आहे.